डोक्यात सतत नकारात्मक येतात? मन शांत राहण्यासाठी 'हे' उपाय करा, एकाग्रता वाढेल

डोक्यात सतत विचार सुरू असतात त्यामुळं मेंदूवर ताण आल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी मन शांत असणे खूप गरजेचे असते. अशांत मनाला शांत करण्यासाठी हे उपाय करुन पाहा. 

| Apr 15, 2024, 18:15 PM IST

डोक्यात सतत विचार सुरू असतात त्यामुळं मेंदूवर ताण आल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी मन शांत असणे खूप गरजेचे असते. अशांत मनाला शांत करण्यासाठी हे उपाय करुन पाहा. 

1/7

डोक्यात सतत नकारात्मक येतात? मन शांत राहण्यासाठी 'हे' उपाय करा, एकाग्रता वाढेल

 keep your soul and mind peaceful with these tips

शारिरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही जपणे खूप गरजेचे आहे. मन अशांत असेल तर ताण वाढतो. ताण-तणावामुळं नैराश्य किंवा शरिरावरही नकारात्मक परिणाम होतो. अशावेळी मन शांत राहण्यासाठी व एकाग्रता वाढवण्यासाठी हे उपाय करुन पाहिले पाहिजेत. 

2/7

प्रियजनांसोबत वेळ घालवा

 keep your soul and mind peaceful with these tips

नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी चांगला पर्याय आहे तो म्हणजे कुटुंबासोबत किंवा आवडत्या व्यक्तींसोबत वेळ व्यतित करा. घरातील सदस्यांसोबत एकत्र वेळ घालवा, एकत्र बसून जेवण करा, वेळ काढून फिरायला जा, यामुळं तुमचं मन शांत राहण्यात  मदत होते.   

3/7

छंद जोपासा

 keep your soul and mind peaceful with these tips

रोजचे धकाधकीचे जीवन आणि कामाचा ताण यामुळं मनात नकारात्मक विचारांची गर्दी होते. अशावेळी मन शांत करण्यासाठी तुमचा छंद जोपासा. पुस्तक वाचणे, गाणं, नृत्य यासारख्या कला तुम्हाला येत असतील तर त्यात तुमचे मन रमवा. 

4/7

व्यायाम करा

 keep your soul and mind peaceful with these tips

उदास वाटत असेल किंवा दिवसभर नाराज वाटत असेल तर तुमची सकाळ प्रसन्न होईल अशा गोष्टी करा. व्यायाम, योग, सकाळच्या मोकळ्या हवेत फिरायला जाणे यामुळं तुम्ही प्रसन्न राहाल आणि मनातील नैराश्याची भावना कमी होईल.   

5/7

डायरी लिहिणे

 keep your soul and mind peaceful with these tips

डायरी लिहणे हा खूप छान पर्याय ठरु शकतो. लिहिते झाल्याने तुमच्या मनात जे साचलेले आहे ते तुम्ही मोकळेपणाने व्यक्त करु शकता. अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी रोज रात्री डायरी लिहित जा.   

6/7

योग

 keep your soul and mind peaceful with these tips

योग केल्याने मानसिक शांतता लाभते. सकाळी उठून एकांतात ध्यान केल्यास सकारात्मक उर्जा मिळते

7/7

संगीत

 keep your soul and mind peaceful with these tips

संगीतात मन रमवल्याने डोक्यात येणारे नकारात्मक विचार दूर होण्यास मदत मिळते. संगीतामुळं मुड हलका होतो आणि चिंतादेखील कमी होते.