फ्रीजमध्ये ठेवूनही हिरव्या मिरच्या सुकतात, काळ्या पडतात? या पद्धतीने करा स्टोर, आठवडाभर टिकतील

| May 08, 2024, 18:14 PM IST

जेवणाची लज्जत वाढवायला किंवा डाळीला फोडणी देण्यासाठी हिरवी मिरची तर हवीच. काही जणांना तर रोजच्या जेवणात हिरव्या मिरचीचा ठेचा लागतो, पण हिरव्या मिरच्या बाजारातून आणल्यानंतर लगेचच सुकून जातात. अशावेळी काय करायचे पाहा. 

1/7

फ्रीजमध्ये ठेवूनही हिरव्या मिरच्या सुकतात, काळ्या पडतात? या पद्धतीने करा स्टोर, आठवडाभर टिकतील

kitchen hacks in marathi how to store green chilly in fridge

हिरव्या मिरचीचा ठेचा असो किंवा लोणचं भारतीय जेवण हे मिरचीशिवाय पूर्ण होतच नाही. रोजच्या जेवणात मिरची लागते म्हणून जास्तीची मिरची गृहिणी आणून ठेवतात. मात्र, काहीच दिवसांत मिरची सुकून जाते. अशावेळी काय करावं, असा प्रश्न पडतो. 

2/7

दोन आठवड्यापर्यंत ताज्या राहतील

kitchen hacks in marathi how to store green chilly in fridge

बाजारातून आणलेली हिरवी मिरची काही दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते. मात्र काही वेळाने ती काळी पडण्यास किंवा सुकण्यास सुरूवात होते. त्यामुळं ही मिरची फेकण्याची वेळ येते. पण तुम्ही या पद्धतीने हिरव्या मिरच्या फ्रीजमध्ये स्टोअर करुन ठेवल्यास दोन आठवड्यापर्यंत ताज्या राहतील. 

3/7

अर्ध्या सेंटीमीटरपर्यंत कापा

kitchen hacks in marathi how to store green chilly in fridge

सगळ्यात पहिले हिरवी मिरची धुवून साफ करा. त्यानंतर तिची देढ काढून घ्या. मिरचीची देढ काढल्यानंतर सुरीने त्याबाजूचाच भाग अर्ध्या सेंटीपर्यंत काढून टाका. लक्षात घ्या की अर्ध्या सेंटीमेटटीर पेक्षा जास्त भाग काढू नका. यामुळं मिरचीमध्ये थोडा ओलावा राहतो आणि ती लवकर खराबदेखील होत नाही. 

4/7

कागदात गुंडाळुन ठेवा

kitchen hacks in marathi how to store green chilly in fridge

मिरची बाजारातून आणल्यानंतर त्याची देढ काढून ठेवा. त्यानंतर या मिरच्या एका कागदाच्या पिशवीत किंवा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. या ट्रिकमुळं मिरची जास्तदिवस फ्रेश राहिल. 

5/7

कापडात गुंडाळुन ठेवा

kitchen hacks in marathi how to store green chilly in fridge

मिरच्या ठेवण्यासाठी जर तुमच्याकडे कागदाची पिशवी नसेल तर तुम्ही एका सुती कापडातही मिरच्या गुंडाळुन ठेवू शकता. टॉवेल मिरचीतील अतिरिक्त ओलावा शोषून घेईल.  

6/7

एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा

kitchen hacks in marathi how to store green chilly in fridge

मिरचीची देढ काढून झाल्यानंतर या मिरच्या एका एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. त्यानंतर हा डब्बा फ्रीजमध्ये भाजी ठेवतो त्या क्रिस्पर ड्रॉव्हरमध्ये ठेवा. एअरटाइट डब्ब्या हवा आत जाऊ देत नाही त्यामुळं मिरची काळी पडणार नाही व मिरची जास्त दिवस टिकेल. 

7/7

डब्यात ठेवा

kitchen hacks in marathi how to store green chilly in fridge

तुम्ही मिरची साध्या डब्यातही ठेवू शकता. मात्र, डब्यात ठेवताना त्यात आधी टिश्यू पेपर किंवा सुती कापड ठेवा त्यामुळं मिरच्या जास्त दिवस टिकतात.