उन्हाळ्यात दही जास्त आंबट होते? या पद्धतीने लावा विरजण

Kitchen Tips in Marathi: कडक उन्हाळ्यात ताक, दही, लस्सी जास्त प्रमाणात प्यायले जातात. शरीराला उष्णता मिळावी, यासाठी थंडावा निर्माण करणारे पदार्थ खाल्ले जातात. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत दही जास्त आंबट होते, यासाठी टिप्स जाणून घ्या. 

| May 08, 2024, 10:39 AM IST
1/7

घरी दही लावल्यानंतर ते जास्त आबंट होते, अशावेळी या काही टिप्स वापरुन तुम्ही दह्यासाठी परफेक्ट विरजण लावू शकता. 

2/7

दही लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तापमान. दही नेहमी थंड जागी स्टोअर करावे. तुम्ही फ्रीजमध्येही दही ठेवू शकता. दही कधीच थेट उष्ण जागी किंवा गरम ठिकाणी ठेवू नका. बाजारातून दही आणल्यानंतर लगेचच फ्रीजमध्ये ठेवा

3/7

दह्यावर जमलेली साय किंवा मलाई बॅक्टिरिया फोफावण्यास मदत करते. त्यामुळं दही लवकर आंबट होते. त्यामुळं दही लावल्यानंतर त्यावर असलेली मलाई काढून टाका. तुम्ही ती मलाई एका दुसऱ्या डिशमध्येही काढून ठेवू शकता. 

4/7

तुमच्या हाथावर असलेले बॅक्टेरियादेखील दही दूषित करु शकता आणि त्यामुळं ते वेगाने खराब होऊ शकते. त्यामुळं दह्याला हात लावण्यापूर्वी किंवा वाढण्यापूर्वी तुम्ही हात स्वच्छ धुवून घ्या.

5/7

दह्याचे विरजण लावण्यासाठी प्लास्टिकच्या डब्यांचा वापर करु नका. प्लास्टिकचे कंटेनरमध्ये दही लवकर खराब होते. दह्याचे विरजण लावण्यासाठी स्टील किंवा काचेचे भांडे उत्तम

6/7

 दही छोट्या डब्यात स्टोअर करा. कारण वारंवार दही बाहेर काढल्याने व हवेच्या संपर्कात आल्याने लवकर खराब होण्याची शक्यता असते. 

7/7

दह्याच्या विरजणासाठी ताक वापरलं मस्त घट्ट दही लागते.