महाराष्ट्रात 'हाय व्होल्टेज' तिसरा टप्पा, पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 3rd Phase Voting : महाराष्ट्रात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 11 मतदारसंघात मतदान होणाराय. अत्यंत निर्णायक असा हा टप्पा आहे. या टप्प्यात राज्यातील बिग फाईट्स रंगणार आहेत. राज्याचं राजकारण ज्यांच्याभोवती फिरतं अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा तिसऱ्या टप्प्यात पणाला लागलीय. आता मतदारराजा कुणाला कौल देतो हे 4 जूनलाच समजेल..

| May 06, 2024, 19:20 PM IST
1/11

बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी दुहेरी लढत होतेय.. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार बारामती लोकसभेच्या रिंगणात आहेत.. 

2/11

सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते असा सामना रंगणाराय.

3/11

माढामध्ये निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असा सामना पाहायला मिळतोय. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजप VS धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादी (SP) VS रमेश बारस्कर, वंचित बहुजन आघाडी अशी लढत आहे. 

4/11

सांगलीत तिहेरी लढत होतेय. चंद्रहार पाटील, शिवसेना ठाकरे पक्ष, भाजपचे संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील असा हा चुरशीचा सामना आहे.

5/11

साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी काँटे की टक्कर आहे.

6/11

कोल्हापूरात शाहू महाराज छत्रपती काँग्रेस VS संजय मंडलिक, शिवसेना शिंदे पक्ष अशी कुस्ती रंगणाराय.

7/11

हातकणंगले लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे पक्षाचे धैर्यशील माने, राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सत्यजित पाटील-सरुडकर, शिवसेना ठाकरे पक्ष अशी तिरंगी लढत आहे.

8/11

रायगड लोकसभा मतदार संघात अनंत गीते, शिवसेना ठाकरे पक्ष VS सुनील तटकरे, राष्ट्रवादी (AP) असा थेट सामना आहे.

9/11

रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. नारायण राणे, भाजप VS विनायक राऊत, शिवसेना ठाकरे पक्ष असा आरपारचा सामना आहे.

10/11

धाराशिवमध्ये  ओमप्रकाशराजे निंबाळकर, शिवसेना ठाकरे पक्ष विरुद्ध अर्चना पाटील, राष्ट्रवादी (AP) असा राजकीय संघर्ष आहे.

11/11

तर लातूर लोकसभा मतदार संघात भाजपचे सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे डॉ.शिवाजी काळगे यांच्यात लढत होणाराय.