वयाच्या 26 व्या वर्षी 'हास्यजत्रा' फेम शिवाली परबनं खरेदी केलं स्वप्नातलं घर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील 'छोटा पॅकेट, बडा धमाका’ अशी ओळख असणारी अभिनेत्री शिवाली परबला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. शिवाली परब ही या कार्यक्रमातून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. नुकतंच शिवालीचं हार्टबीट वाढणार हाय हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. याच निमित्तानं शिवालीनं तिच्या खासगी आयुष्याविषयी एक मोठा खुलासा केला आहे. 

| Apr 29, 2024, 19:29 PM IST
1/7

शिवाली परब

शिवाली परब हे नाव कोणासाठी नवीन नाही. शिवाली आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. तर नुकतंच तिचं एक गाण प्रदर्शित झालं आहे. 

2/7

वाढदिवसाची खास तयारी

शिवालीनं हे गाणं प्रदर्शित झालं असून त्यानिमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत शिवालीनं तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

3/7

शिवाली खरेदी केलं स्वप्नातलं घर

शिवालीनं मीडिया टॉल्कला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. शिवालीला वाढदिवसाच्या प्लॅनिंगविषयी विचारताच ती म्हणाली, "यंदा वाढदिवसासाठी असे फार काही स्पेशल नाही. ही गोष्ट अजून मी कुठेच सांगितलेली नाही. पण, आता सांगते…मी घर घेतलंय." 

4/7

नवीन घराची पूजा

शिवालीच्या या नवीन घराची पूजा 10 मे रोजी आहे. त्याविषयी सांगत ती म्हणाली "नवीन घराची पूजा मी 10 तारखेला ठेवलेली आहे. हे सर्व प्रेक्षकांमुळे शक्य झालं, कारण जे काम सुरु त्यामुळे हे शक्य झालं. त्यामुळे हा वाढदिवस माझ्यासाठी खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे." 

5/7

शिवालीचा 29 वा वाढदिवस

यंदा शिवालीचा 26 वा वाढदिवस आहे. वयाच्या 26व्या वर्षी शिवालीनं स्वत: घर खरेदी केलं आहे. 

6/7

प्रेक्षक उस्तुक

शिवालीच्या या घराची झलक प्रेक्षकांना आता 10 मे रोजीच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सगळेच उस्तुक आहेत. 

7/7

(All Photo Credit : Shivali Parab)