Impact Player rule: पुढच्या वर्षी IPL मध्ये नसणार इम्पॅक्ट प्लेयर नियम? जय शाहंनी दिली अपडेट

Impact Player rule: गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमधील इंम्पॅक्ट प्लेअरचा नियम फार चर्चेत आहे. यावर आता बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी यावर भाष्य केलं आहे. 

May 10, 2024, 12:33 PM IST
1/7

IPL 2024 मध्ये इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमांबाबत काही वादही निर्माण झाले होते. 

2/7

क्रिकबझच्या अहवालानुसार, जय शाहने इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाला पाठिंबा दर्शवला आहे. 

3/7

दरम्यान यावेळी त्यांनी हा नियम कायम ठेवला जाईल याची अद्याप पुष्टी केलेली नाही. 

4/7

परंतु या नियमामुळे दोन खेळाडूंना मैदानात उतरण्याची मुभा मिळते. 

5/7

यामुळे नवीन खेळाडूंनाही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत असल्याचं जय शाह मत आहे.

6/7

जय शाह यांच्या म्हणण्यानुसार, इम्पॅक्ट प्लेअर नियम चाचणी म्हणून वापरण्यात येत असून यामुळे 2 भारतीय खेळाडूंना आयपीएल खेळण्याची संधी मिळते.

7/7

काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या नियमावर नाराजी व्यक्त केली होती.