देख रहा है बिनोद! Panchayat Season 3 'या' दिवशी होणार प्रदर्शित

अखेर 'पंचायत'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली समोर... सीरिजच्या 3 ऱ्या सीझनच्या प्रदर्शनाची तारिख आली समोर. आता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना फुलेरा गावात काय सुरु आहे हे पाहायला मिळणार आहे. 

| May 02, 2024, 16:54 PM IST
1/7

'पंचायत' या लोकप्रिय ठरलेल्या सीरिजचा 3 भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर आज निर्मात्यांनी आज 2 मे रोजी प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. 

2/7

एक दिवस आधी निर्मात्यांनी चाहत्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला होता. दुधी भोपळा त्यात दाखवण्यात आला होता. त्याचा गेमही त्यांनी चाहत्यांना खेळायला लावला. 

3/7

आपल्या हटके भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या सीरिजमध्ये सचिव जी असो मग किंवा प्रधान जी... या सीरिजमधील सहाय्यक कलाकारांनी देखील त्यांच्या ह्युमरनं प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली आहे. 

4/7

जेव्हा पासून या सीरिजच्या 3 सीझनची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हा पासून या सीरिजमधील अनेक डायलॉग्स हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

5/7

पहिल्या दोन सीझनमध्ये फुलेरा गावातील रहिवासींना कशा प्रकारे वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे काय काय गोंधळ होतो, ते पाहायला मिळालं. आता तिसऱ्या सीझनमध्ये काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. 

6/7

आता या सीरिजचा 3 रा सीझन हा 28 मे रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

7/7

जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय संविका वापसी आणि इतर काही कलाकारा आपल्याला यात दिसणार आहेत. या सीरिजची निर्मिती द व्हायरल फीवरनं केली आहे. तर सीरिजचं दिग्दर्शन दीपक कुमार  मिश्रा यांनी केलं आहे. तर चंदन कुमारनं पंचायत 3 ची पटकथा लिहिली आहे.    हेही वाचा : गोविंदाच्या भाचीनं ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी मागितली माफी! पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी माझ्या मूळ धर्माकडे...'