प्रीती झिंटाकडे एकापेक्षा एक जबरदस्त गाड्या, पाहा कार कलेक्शनची झलक

 प्रीती झिंटाची किंग्ज इलेव्हन पंजाबची टीम आयपीएलचा सिझन जिंकू शकली नाही. असे असले तरी प्रीती आपल्या टीमला चिअर करायची एकही संधी सोडत नाही.

| Apr 28, 2024, 13:15 PM IST

Preity Zinta car collection: प्रीती झिंटाची किंग्ज इलेव्हन पंजाबची टीम आयपीएलचा सिझन जिंकू शकली नाही. असे असले तरी प्रीती आपल्या टीमला चिअर करायची एकही संधी सोडत नाही.

1/7

प्रीती झिंटाकडे एकापेक्षा एक जबरदस्त गाड्या, पाहा कार कलेक्शनची झलक

Preity Zinta car collection Mercedes Lexus Range Rover

Preity Zinta car collection: आयपीएल 2024 ची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. विविध टिमचे प्लेयर्स जसे दिग्गज आहेत, त्याप्रमाणे त्यांचे मालकही एकापेक्षा एक आहेत. मुकेश अंबानींची मुंबई इंडियन्स टीम सर्वांचीच आवडती आहे. सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ काव्या मारन सोशल मीडियात ट्रेंडिगला असतात. केकेआरचा मालक शाहरुख खानची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात. या यादीतील आणखी एक संघ मालक खास आहे. ती म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा. प्रीती ही पंजाब किंग्जची सह-मालक आहे.

2/7

टीम प्लेयर्सना प्रोत्साहन

Preity Zinta car collection Mercedes Lexus Range Rover

प्रीती झिंटाची किंग्ज इलेव्हन पंजाबची टीम आयपीएलचा सिझन जिंकू शकली नाही. असे असले तरी प्रीती आपल्या टीमला चिअर करायची एकही संधी सोडत नाही. कधी स्टेडियममधून तर कधी मैदानात येऊन ती आपल्या टीम प्लेयर्सना प्रोत्साहन देत असते. प्रीतीच्या कार कलेक्शनमध्ये खूप महागड्या गाड्या आहेत. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

3/7

मर्सिडीज-बेंझ GLS 350d

Preity Zinta car collection Mercedes Lexus Range Rover

या यादीतील पहिला क्रमांक मर्सिडीज-बेंझ जीएलसी 350d आहे. हे मॉडेल आता भारतात मिळत नाही.  2016 ते 2020 दरम्यान विकल्या गेलेल्या या मर्सिडीज एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 97.9 लाख रुपये होती. या कारमध्ये 3.0-लिटर V6 डिझेल इंजिन आहे. जे 255 bhp ची पॉवर आणि 620 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

4/7

रेंज रोव्हर वोग

Preity Zinta car collection Mercedes Lexus Range Rover

बहुतेक लक्झरी कार मालकांच्या कार कलेक्शनमध्ये लँड रोव्हर असतेच. पंजाब किंग्जची सह-मालकीण प्रीतीकडे रेंज रोव्हर वोग आहे. ही कार आता भारतात विकली जात नाही. रेंज रोव्हर वोग अनेक इंजिन कॉन्फिगरेशनमध्ये आहे.. मात्र यातील प्रिती झिंटाकडे कोणते मॉडेल आहे? हे स्पष्ट झालेले नाही.

5/7

लेक्सस LX 470

Preity Zinta car collection Mercedes Lexus Range Rover

प्रीतीच्या कार कलेक्शनमध्ये Lexus LX 470 देखील आहे. ही कारदेखील आता भारतात विकली जात नाही. LX 470 पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. पण प्रीतीकडे यातील कोणते मॉडेल आहे, हे समोर आले नाही. दरम्यान LX 470 एक सॉलिड ऑफ-रोडर आहे. रस्त्यावर अतिशय आरामदायी राइड देण्यासाठी ही कार ओळखली जाते. 

6/7

मित्सुबिशी लान्सर

Preity Zinta car collection Mercedes Lexus Range Rover

मित्सुबिशी लान्सर कार प्रीतीच्या कलेक्शनची शान वाढवते. लॅन्सर ही जगभरातील अनेक बाजारपेठांतील प्रसिद्ध असलेली कार आहे आणि स्पोर्ट्स रॅलींगमधील लोकप्रिय नाव आहे. कार निर्मात्याने कार अखेर बंद होण्यापूर्वी अनेक वर्षे भारतात लॅन्सरची विक्री केली. लान्सर हा होंडा सिटी आणि मारुती सुझुकी बलेनोचा थेट प्रतिस्पर्धी होता आणि अजूनही रॅली चालकांमध्ये लोकप्रिय आहे.

7/7

चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या

Preity Zinta car collection Mercedes Lexus Range Rover

नव्वदीच्या शतकातील मुले 2003 मध्ये आलेल्या 'कोई मिल गया'तील  प्रीती झिंटाचा अभिनय कधी विसरु शकत नाहीत. यासोबतच तिच्या दिल चाहता है, कल होना हो आणि सलाम नमस्ते यासारख्या चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या आहेत. दोन्ही गालांवरच्या खोल खळ्या आणि मधाळ डोळे यासाठी तिचे लाखो चाहते आहेत.