Ram Navami Wishes in Marathi : राम जन्मला ग सखे राम जन्मला...राम नवमीच्या द्या खास शुभेच्छा

Happy Ram Navami 2024 Wishes in Marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला राम नवमी साजरी करण्यात येते. जगभरात रामनवमीचा उत्साह मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. या शुभ दिनाच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींना पाठवा आणि स्टेट्सवर ठेवा फोटो. 

Apr 16, 2024, 13:30 PM IST

 

 

1/10

राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा..!

2/10

दशरथ नंदन राम दया सागर राम सत्यधर्म पारायण राम राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा..!  

3/10

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा!  

4/10

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही, वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा  

5/10

वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!  

6/10

तीर्थासि जातां बहु दुःख वाटे । विषयांतरी राहुनी सौख्य वाटे । स्वहीत माझें मजला कळेना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा  

7/10

मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा  

8/10

 संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी । प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना श्री रामनवमीच्या शुभेच्छा!  

9/10

छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा, श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!  

10/10

मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा