Sachin Tendulkar Net Worth : निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकर कसं आणि किती कमवतो?

Sachin Tendulkar Birthday : क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही सचिन तेंडुलकर कसं आणि किती कमवतो तुम्हाला माहिती आहे का? त्याची एकूण संपत्तीचा आकडा एकून अवाक् व्हाल. 

Apr 23, 2024, 16:22 PM IST
1/9

क्रिकेटचा देव हा देशातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतरही आज 10 वर्ष उलटून गेला असला तरी सचिन हा मार्केटमध्ये सर्वात लोकप्रिय ब्रँडपैकी एक आहे. 

2/9

सचिनची एकूण संपत्ती ही 175 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1436 कोटींच्या घरात आहे. सचिन  जाहिरातींमधून चांगली कमाई करतो. तो अनेक मोठ्या कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.

3/9

सचिनचा मुंबईतील पॉश वांद्रे भागात एक आलिशान बंगला असून त्याची किंमत अंदाजे 100 कोटींपर्यंत असेल. 

4/9

तर मुंबईतील वांद्रेमधील कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक आलिशान फ्लॅट असून त्याची किंमत 7.15 कोटी रुपये असल्याच मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय. मुंबईशिवाय सचिनचा केरळमध्येही करोडोंचा बंगला आहे.  

5/9

सचिनकडे 1,78 कोटींची BMW X5 M50d होती जी त्याने 2021 मध्ये विकली. 

6/9

BMW i8 सचिनकडे असून त्याने ती 2.62 कोटी रुपयांना घेतली आणि आज त्याची किंमत 4 कोटींना आहे. 

7/9

Sach आणि Spinny यासह विविध स्टार्टअपमध्येही त्याने गुंतवणूक केलीय. SmartronIndia, Smaaash Entertainment JetSynthesys, International Tennis Premier League आणि @sdrive_india यांचा समावेश आहे. 

8/9

सचिनने सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी करत 29 कसोटी शतकं पूर्ण केल्यामुळे त्याला फेरारी देण्यात आली. त्याची किंमत 75 लाख रुपये होती पण आयात शुल्कानंतर त्याची किंमत सुमारे 11 कोटी होती. या फेरारीवरुन वाद झाला होता त्यानंतर सचिनने ती विकली. 

9/9

सचिनला घड्याळे आवड असून त्याच्याकडे ऑडेमार्स पिकेटची रॉयल ओक पर्पेच्युअल कॅलेंडर वॉच आहे.