PHOTO: मुलांना शिकवा सद्गगुरुंनी सांगितलेले 7 'क', मुलं घेतील यशस्वी आणि उत्तुंगु भरारी

Sadguru Wamanrao Pai Parenting Tips : प्रत्येक पालक हा कायमच मुलांच्या चांगल्याचा आणि प्रगतीचा विचार करत असतो. पण मुलांना लहानपणापासूनच उत्कर्ष आणि उन्नतीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. अशावेळी सद्गुरुंनी सांगितलेल्या या 7 'क' चे महत्त्व पटवून द्या. 

| May 08, 2024, 12:08 PM IST

Sadguru Wamanrao Pai Parenting Tips : मुलांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी पालक अगदी सुरुवातीपासूनच प्रयत्नशील असतात. लहानपणापासूनच त्यांचा कामाच आणि मेहनतीचं महत्त्व शिकवलं जातं. पण तरीही पालकांना नेमकं काय करावं? कळत नाही. कारण मुलांना शाळेतून अभ्यासक्रम शिकवून शिक्षित केलं जातं पण मुलांना कामाचं आणि जीवनात उत्कर्ष आणि उन्नतीचं महत्त्व पटवून देणं अत्यंत गरजेचं आहे. अशावेळी सद्गगुरु श्री वामनराव पै यांनी सांगितल्या 7 'क' च्या महत्त्वाच्या पायऱ्या. 

फक्त लहान मुलांनीच नाही तर मोठ्यांनी देखील या 7 'क' जर जीवनात अंगीकारल्या तर त्याचा नक्कीच फायदा होईल. 

1/7

कष्ट

Satguru Wamanrao Pai

पालकांनी लहानपणापासूनच मुलांना कष्टाचे महत्त्व पटवून द्यावं. कारण कष्ट, मेहनत करुन जीवनात यश संपादन केलं जाऊ शकतं. अनेकदा लहान वयात मोबाईल हातात आल्यावर मुलांना सर्व गोष्टी सहज शक्य वाटतात. अशावेळी पालकांनी ठरवून काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. 

2/7

कर्तव्य

Satguru Wamanrao Pai

लहान मुलांचं कर्तव्य आहे की, जीवनात त्यांनी यश संपादन करावं, अभ्यास करावा. मुलांवर प्रेम करताना पालक त्यांना कर्तव्याची जाणीव करुन द्यायला विसरतात. लहान मुलांचं कर्तव्य आहे की, त्यांची प्रचंड मेहनत करुन, लक्ष देऊन अभ्यास करावा. आणि आपल्या देशाचं नावं मोठं करावं. 

3/7

कौशल्य

Satguru Wamanrao Pai

कौशल्य हे जीवनात अतिशय महत्त्वाचं आहे. मुलांना कौशल्याचं महत्त्व लहानपणीच पालकांनी पटवून द्यावं. कारण मुलांना अभ्यासापासून ते त्यांच्या करिअरच्या टप्प्यावर प्रत्येक क्षणाला कौशल्याने काम करावे लागते. कौशल्याने केलेल्या प्रत्येक कामात नाविण्य असतं, असं सद्गुरु म्हणतात. 

4/7

कल्पकता

Satguru Wamanrao Pai

कल्पकता खूप महत्त्वाची आहे. लहान मुलांना अभ्यास कल्पकतेने कसा करावा याचं महत्त्व पालकांनी पटवून देणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट असो मुलांनी ती कल्पकनेते करायला हवी. मग तो अभ्यास असो किंवा खेळ. प्रत्येक गोष्टीत नाविण्य आणायला हवं. 

5/7

कौतुक

Satguru Wamanrao Pai

कौतुक कुणाला आवडतं नाही? मुलांना इतर कोणत्या स्वभावातील गुणांबद्दल कळलं नाही तर कौतुक अतिशय आवडतं. अशावेळी पालकांनी मुलांना कौतुक करायला शिकवावं देखील आणि त्यांचं कौतुक देखील करावं.

6/7

करुणा

Satguru Wamanrao Pai

लहान मुलांना करुणा म्हणजे काय?हे सहज या लहान वयात कळणं कठीण आहे. अशावेळी पालकांनी त्यांना या गुणाबद्दल अनुभवातून सांगावं. जसे की, प्रत्येकाशी माणुसकीने आणि आपुलकीने वागावे. आपल्या मित्र-मैत्रिणींशी मुलांना या पद्धतीने वागायला शिकावे. भूतदयेचे महत्त्व पटवून द्यावे. 

7/7

कृतज्ञता

Satguru Wamanrao Pai

कृतज्ञता हा सर्वात जास्त महत्त्वाचा गुण आहे. कृतज्ञता ही भावना मुलांमध्ये लहानपणापासूनच असणे अतिशय फायदेशीर ठरते. सुरुवातीला पालकांनी मुलांची कृतज्ञता व्यक्त करावी. यामधूनच ही मुलं या गोष्टी शिकणार आहेत.