World Cup: जहीरच्या 'टीम इंडिया'त एकही अंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू; संपूर्ण संघ पाहून बसेल धक्का

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan: 5 जून पासून सुरु होत असलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघ निवड होण्याआधीच माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या पसंतीचे संघ कोणते असतील याबद्दल मतं व्यक्त करण्यास सुरुवात केलेली असतानाच जहीर खाननेही आपल्या पसंतीचा 16 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघातील काही नावं खरोखरच आश्चर्यचकित करणारी आहेत. जहीरने निवडलेला संघ कसा आहे पाहूयात...

| Apr 28, 2024, 10:59 AM IST
1/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्या इंडियन प्रिमिअर लीगदरम्यान समालोचन तसेच सामन्यादरम्यान विश्लेषक म्हणून जबाबदारी पार पडणाऱ्या जहीर खानने जून महिन्यामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला आहे.

2/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

विशेष म्हणजे जहीर खानने अजून एकही अंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या एका गोलंदाजाला वर्ल्डकपच्या संघात स्थान दिलं आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये जहीरने स्थान दिलेल्या या खेळाडूमुळे गोलंदाजीला अधिक धार येईल असं जहीरचं म्हणणं आहे. 

3/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

आपल्या दृष्टीने भारतीय संघांत राखीव खेळाडूसहीत कोणत्या 16 खेळाडूंना स्थान दिलं जावं हे सांगताना जहीर खानने ऋषभ पंत हा एकमेव विकेटकीपर संघात असावं असं म्हटलं आहे. 

4/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

जहीर खानने ज्या अनकॅप म्हणजेच अंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या खेळाडूला संघात स्थान दिलं आहे त्याचं नाव आहे यश दयाल! 26 वर्षीय यश हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.   

5/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये यश दयाल उत्तर प्रदेशकडून खेळतो. तर 2024 च्या आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून खेळत आहे. जहीर खानने सध्या आजारपणामधून रिकव्हर होत असलेल्या मोहम्मद शमीच्या जागी यशला संधी द्यावी असं म्हटलं आहे. 

6/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

"मी यश दयालचं नाव 15 खेळाडूंमध्ये घेत आहे ते या अटीवर की जखमी असलेल्या मोहम्मद शमीला स्थान दिलं जाणार नाही. तुम्हाला सुरुवातीला उत्तम गोलंदाजी करणारा एखादा गोलंदाज हवा असेल तर यश दयालचा विचार करता येईल. तर तुम्हाला सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये उत्तम गोलंदाज हवा असेल आणि सिराजला लय गवसत नसेल तर तिथेही तुम्ही याचा वापर करु शकता," असंही जाहीर आपल्या निवडीसंदर्भात स्पष्टीकरण देताना 'जीओ सिनेमा'वर म्हणाला आहे.

7/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

जाहीर खानने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला संघात स्थान दिलं आहे. विशेष म्हणजे हा एकमेव विकेटकीपर जहीरने निवडला आहे. संजू सॅमसन, के. एल. राहुल आणि इशान किशनऐवजी जहीरने ऋषभला पसंती दर्शवली आहे.

8/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

"माझ्या संघात ऋषभ पंत हा एकमेव विकेटकीपर असेल. मी चार वेगवान गोलंदाजांना संधी देण्यासंदर्भात अधिक उत्सुक आहे. अन्य एका विकेटकीपरसाठी तुम्ही वेगवान गोलंदाजाला संधी नाकारु शकत नाही. तुमच्याकडे के. एल. राहुल. संजू सॅमसनसारखे पर्याय आहेत. तुम्हाला तसं तर दिनेश कार्तिकलाही संघात पाहायला आवडेल," असंही जहीर म्हणाला.  

9/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

"तसा सध्याचा विचार केला तर तुम्ही धोनीचाही विचार करु शकता कारण त्याचा स्ट्राइक रेट चांगला आहे. मला वाटतं ते सध्याच्या खेळाडूंवर अधिक लक्ष देतील ज्यात संजू सॅमसन, के. एल. राहुल किंवा अगदी जितेश शर्माचाही समावेश आहे," असं जहीर म्हणाला. "तुम्ही एका महिन्याच्या मालिकेच्या आधारे संघ निवडत असाल तर तुमचा राखीव खेळाडू हा विकेटकीपर हवा," असं जहीरने स्पष्टपणे सांगितलं.  

10/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

जाहीर खानने आपला 16 जणांचा संघ निवडताना गुजरात टायटन्सच्या केवळ कर्णधाराला म्हणजेच शुभमन गिलला संधी दिली आहे. तर राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयसवाल हा रोहित शर्माबरोबर ओपनिंगला येणारा दुसरा खेळाडू ठरु शकतो असं जहीरचं म्हणणं आहे.

11/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

"दोन उत्तम पर्याय असताना त्यापैकी एकाची ओपनर म्हणून निवड करण्याचं आव्हान निवड समितीच्या सदस्यांसमोर असेल. शुभमन गिल आणि यशस्वी जयसवालपैकी एकाला निवडावं लागेल. या दोघांपैकी एकालाच संधी मिळेल कारण असं केलं तर संघात फ्लेक्झिबिलीटी ठेवता येईल," असं जहीर म्हणाला. "खेळाडूला एकच भूमिका पार पाडावी लागेल असं वाटत नाही. फलंदाजीच्या क्रमात बदल करावी लागेल," असंही जहीर म्हणाला.  

12/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

जहीरने टी-20 वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघातील फलंदाज - रोहित शर्मा, शुभमन गिल किंवा यशस्वी जयसवाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिंकू सिंह  

13/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

जहीरने टी-20 वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघातील अष्टपैलू खेळाडू आणि विकेटकीपर - शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा तसेच एकमेव विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतला संधी द्यावी अशी मागणी  

14/14

T20 World Cup Indian Squad By Zaheer Khan

जहीरच्या टी-20 वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघातील गोलंदाज - जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, यश दयाल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल