T20 World Cup : बघा काय आहे खास न्यूझीलंडच्या नव्या टी20 वर्ल्ड कपच्या जर्सीमध्ये, पाहा फोटो

New Zealand WC T20 new Jersey : क्रिकेट टी20 वर्ल्ड कप साठी आता फक्त काही दिवस बाकी आहेत, त्याआधी न्यूझीलंड क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड कप 2024 साठी नवी जर्सी लॉन्च केली आहे. पण या नव्या जर्सीमध्ये असे काही खास दडलयं, ज्यामुळे ही जर्सी अजून खास बनलेली आहे, तर जाणून घेऊया का आहे खास न्यूझीलंडची वर्ल्ड कपची ही नवी जर्सी?  

Apr 30, 2024, 17:44 PM IST
1/7

न्यूझीलंड क्रिकेटबोर्डाने नुकताच एका खास अंदाजात आपल्या क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. दोन चिमुकल्या मुलांना स्टेजवर बोलावुन त्यांनी न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप स्क्वॉडची घोषणा केली होती.   

2/7

यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने संघातील खेळाडूंचा खास फोटोशुट करून त्यांचे फोटो टीमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आणि यासोबतच येत्या टी20 वर्ल्ड कपची जर्सी सुद्धा लॉंच केली आहे. 

3/7

पण खूप सारे क्रिकेट फॅन्स आणि क्रिकेट तज्ञांना न्यूझीलंडची ही जर्सी बघुन त्यांच्या काही जून्या आठवणींना दुजोरा मिळत आहे.   

4/7

न्यूझीलंडची ही नवी जर्सी क्रिकेट फॅन्स आणि क्रिकेट तज्ञांना 1999 मधील वर्ल्ड कपमधील न्यूझीलंडच्या जून्या रेट्रो जर्सीची आठवण करून देत आहे  

5/7

न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने 1999 च्या वर्ल्ड कप मध्ये आपल्या जर्सीत इलेक्ट्रीक ब्लू रंगाचा वापर केला होता आणि पॅन्ट, शर्ट आणि टोपीवर पाच वेळेस सिल्वर फर्न सुद्धा काढले होते.  

6/7

यावर्षीच्या न्यूझीलंडची जर्सी पूर्णपणे कॉपी नसून, आताच्या नव्या जर्सीमध्ये थोडा फरक आहे. तो म्हणजे या जर्सीत मोठ्या अक्षरात इंग्रजीमध्ये न्यूझीलंड असं लिहिलं आहे. यामध्ये थोडा पांढरा रंगसुद्धा वापरला गेला आहे. 

7/7

विशेष गोष्ट म्हणजे येत्या 30 एप्रिलपासुन न्यूझीलंड संघाची ही नवी जर्सी न्यूझीलंड क्रिकेट स्टोर म्हणजेच NZC वर उपलब्ध असेल. जेथून क्रिकेट फॅन्स हे या जर्सीला विकत घेऊ शकणार आहेत.