महाराष्ट्रातील सर्वात साधा, सरळ, सोप्पा ट्रेक; नाशिकच्या सौंदर्यात भर घालणार त्रिंगलवाडी किल्ला

 त्रिंगलवाडी किल्ला नेमका आहे कुठे आणि इथं जायचं कस जाणून घेवूया.  

Apr 29, 2024, 17:47 PM IST

Nashik Tringalwadi Fort Trek : नाशिकचा त्रिंगलवाडी किल्ला तसा फारसा प्रसिद्ध किल्ला नाही. मात्र, ट्रेकर्स मंडळींंना या किल्ल्याची चांगलीच माहिती आहे.  नाशिक जिल्ह्यांतील इगतपुरी तालुक्यातील घोटी या गावातून या किल्ल्यापर्यंत जाता येते.

1/7

महाराष्ट्रातील अनेक गड किल्ले हे अवघड वाटेचे आहेत. नाशिकमध्ये मध्ये मात्र, एक असा किल्ला आहे जो साधा, सरळ, सोप्पा ट्रेक यासाठी ओळखला जातो. 

2/7

हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला याबाबत काहीच माहिती नाही. मात्र, 1688 च्या अखेरीस मुगलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला होता असे सांगितले जाते. 

3/7

किल्ल्याच्या पायथ्याशी पांडवलेणी नावाची गुहा आहे.  आत विहार आणि विहारात कोरलेले कोनाडे, प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम आढळते.   

4/7

किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण दहाव्या शतकात झाली असावी असे अभ्यासक सांगतात.

5/7

गिरीदुर्ग प्रकारातील  त्रिंगलवाडी किल्ला समुद्रसपाटीपासून 3238 फूट उंचीवर आहे.  

6/7

 किल्ल्यापासून जवळच असणारे त्रिंगलवाडी धरण, सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील बळवंतगड आणि कावनई तसेच आसपासचे किल्ले असे विहंगम दृष्य येथे पहायाला मिळेत. 

7/7

त्रिंगलवाडी किल्ल्याचा हा ट्रेक आहे. नाशिकच्या सौंदर्यात भर घालणार त्रिंगलवाडी किल्ला ट्रेकर्सना आकर्षित करतो.