तुम्ही कधी रेल्वे स्थानकावरील 'समुद्रसपाटीपासूनची उंची' लिहिला बोर्ड पाहिला का?

Indian Railway Interesting Facts: रेल्वेने प्रवास करताना अनेक गोष्टी नजरेआड येतात.  जसे की रेल्वे स्थानकावर मार्गदर्शक तत्वे लिहिलेली असतात. अनेकदा ही तत्वे आपल्याला माहित असता तर काही मार्गदर्शक तत्वे आपल्याला माहित नसतात. यामध्ये अनेकांना प्रश्न पडला असले की, रेल्वे स्थानकावरील स्टेशनचं नाव असणाऱ्या बोर्डवर स्थानकाच्या नावासोबत समुद्रसपाटीपासूनची उंची पण का दिलेली असते. 

Feb 20, 2024, 12:53 PM IST
1/8

तुम्ही कधी रेल्वेने प्रवास करताना बाहेरच्या दिशेन पाहिल्यात तर तुम्हाला रेल्वे स्थानकावर वेगवेगळी मार्गदर्शक तत्वे लिहिलेली असतात. अनेकादा त्यामध्ये आपल्या उपयोगाचे असते तर काही आपल्या उपयोगाचे नसते. जे वाचून आपण दुर्लक्ष करतो.   

2/8

आज आम्ही तुम्हाला अशीच एक खास माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी आवश्यक नसून तुम्ह ज्या ट्रेनमध्ये जात आहात त्या ट्रेनच्या ड्रायव्हरसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. 

3/8

जसे की, रेल्वे स्थानकावर लावलेला स्टेशनच्या नावाचा पिवळा बोर्ड आपल्या नेहमीच ट्रेनमधून येता जाताना दिसत असतो. या बोर्डावर रेल्वे स्थानकाचे नाव लिहिलेलं असतं. हे नाव ही वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलं जातं. यापैकी एख भाषा इंग्रजी आहे, तर दुसरी भाषा नेहमी जागेनुसार बदलते. महाराष्ट्रात असेल तर मराठी, गुजरातमध्ये असेल तर गुजराती भाषेमध्ये असते. 

4/8

रेल्वे स्थानकावरील या पिवळ्या बोर्डावर केवळ स्थानकाचे नाव नाही तर त्याखाली समुद्रसपाटीपासूनची 400 मीटर, 310 मीटर, 150 मीटर अशी उंचीही बोर्डवर लिहिलेली तुम्ही पाहिली असेल. पण तुम्ही कधी हे जाणून घेण्याता प्रयत्न केला आहे का? रेल्वे स्टेशनच्या नावाखाली समुद्रसपाटीपासूनची उंची  का लिहिली जाते?   

5/8

रेल्वे स्थानकाच्या नावाच्या बोर्डवर खालच्या भागावर समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. उदा. MSL 214-42 Mts. वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर संख्या वेगवेगळी आहे. तुम्हाला MSL चा अर्थ माहित आहे का?   

6/8

देशातील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांवर समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. याचा सामान्य प्रवाशांचा काही संबंध नाही. परंतु कोणत्याही रेल्वे चालक आणि गार्डसाठी हे चिन्ह खूप महत्वाचे आहे. कारण त्या स्थानकावरुन जाणाऱ्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे.

7/8

प्लॅटफॉर्मवरील स्थानकाचे नाव असलेल्या बोर्डाच्या तळाशी त्या स्थानकाची उंची समुद्रसपाटीपासून किती आहे ते लिहिलेलं असतं. हे ट्रेनच्या ड्रायव्हरसाठी खूप महत्वाचे आहे.   

8/8

समुद्रसपाटीच्या या उंचीवरून लोको पायलटला आणखी चढाई आहे की उतार याचा अंदाज येऊ शकतो. त्यानुसार गाडीचा ड्रायव्हर इंजिनचा वीजपुरवठा आणि वेग ठरवतो. जेणेकरून ट्रेन सहज डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकेल. त्याचप्रमाणे रेल्वे जर समुद्रसपाटीच्या खाली जात असेल तर गाडी किती वेगाने पुढे न्यायची, हे सर्व जाणून घेण्यासाठी समुद्रसपाटीची उंची (MSL) लिहिली असते.