Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांना मिळणार आनंदाची बातमी, तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 20 to 26 may 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 20 ते 26 मेपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

May 20, 2024, 09:16 AM IST
1/10

Weekly Numerology 20 to 26 may 2024 in Marathi : या आठवड्याची सुरुवात प्रदोष व्रताने होतेय. त्यामुळे हा आठवड्यात भगवान महादेवाची कृपा बरसणार आहे. तर 23 मे गुरुपौर्णिमेला अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. अशात 20 ते 26 मे हा आठवडा अंकशास्त्रानुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या अंकशास्त्र डॉ. कविता ओझा यांच्याकडून 

2/10

मूलांक 1

या मूलांकासाठी हा आठवडा प्रेमसंबंधांमध्ये परस्पर प्रेम वाढवणारा ठरणार आहे. कार्यक्षेत्रात हळूहळू सुधारणा होणार आहे. तुम्हाला कामात यश मिळणार आहे. आर्थिक बाबींमध्ये हळूहळू आर्थिक लाभ होणार आहे. तर गुंतवणुकीतून फायदा मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात सुखद अनुभव आणणार आहे. आठवड्याचा शेवट आनंद आणि समृद्धीने होणार आहे. 

3/10

मूलांक 2

प्रेम जीवनात आनंद दार ठोठवणार आहे. कामात काही महत्त्वाचा निर्णय घेणार असाल ते पुढे ढकलणे हिताच ठरेल. एखाद्या प्रकल्पात तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. आर्थिक बाबींमध्येही खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. तुम्ही चिंतेत असणार आहे.

4/10

मूलांक 3

आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असणार आहे. कुठेतरी अडकलेले पैसेही तुम्हाला. न्यायालयीन खटलेही तुमच्यासाठी चांगले निर्णय घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या शब्दांवर ठाम राहिल्यास आणि निर्णय घेतल्यास सुधारणा होईल. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी वेळ अनुकूल असणार आहे.   

5/10

मूलांक 4

या आठवड्यात गोड आणि आंबट अनुभव तुम्हाला येणार आहेत. कामाच्या ठिकाणी काही गोष्टीत नफा तर काही ठिकाणी तोटा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक सहली तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे. आर्थिक बाबतीत नवीन सुरुवात केल्याने बँक बॅलेन्स वाढणार आहे. पैशाशी संबंधित बाबींमध्येही तुम्हाला थोडेसे बंधन येणार आहेत.

6/10

मूलांक 5

नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या शुभ संधी तुम्हाला लाभणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला तुमचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तुमच्या प्रियजनांकडून खूप मदत मिळणार आहे. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहणार असून आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडणार आहे. लव्ह लाईफमध्ये रोमान्स असणार आहे. 

7/10

मूलांक 6

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर खूप काही साध्य करण्यात यशस्वी होणार आहे. आर्थिक बाबतीत, काळ हळूहळू अनुकूल असणार आहे. तुमच्या गुंतवणुकीतून आर्थिक नफा मिळणार आहे. प्रेमसंबंधात, अचानक एखादी बातमी मिळाल्यावर तुम्हाला वाईट वाटणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. 

8/10

मूलांक 7

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. भागीदारीत केलेल्या कामात सुधारणा होणार आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण केल्यास फायदा होईल. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल राहणार असून आर्थिक फायदा होणार आहे. या आठवड्यापासून तुमच्यासाठी शुभ परिणाम दिसून येणार आहे. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम अधिक घट्ट करणार ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी, आनंद आणि समृद्धीची तुमच्या दारात येणार आहे. 

9/10

मूलांक 8

तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणार आहे. प्रेम जीवनात आनंदच आनंद असणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या सुंदर ठिकाणी बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. कामाच्या ठिकाणी संवादाने प्रश्न सोडवणे तुमच्यासाठी हिताच ठरेल. आठवड्याच्या शेवटी वेळ अनुकूल राहणार आहे. 

10/10

मूलांक 9

आर्थिक बाबींसाठी या आठवड्यात तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. प्रेम संबंधात, परस्पर प्रेम दृढ होणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काही प्रोत्साहन मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी आळसाने घेरले असाल तर तुम्हाला त्रास सहन करावा लागणार आहे. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धीचे योग आहेत. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)