Blood Group: भारतातील सर्वात कॉमन आणि सर्वात दुर्मिळ रक्तगट कोणता?

Blood Group: रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. काही आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना रक्ताची आवश्यकता भासू शकते. अपघातग्रस्तांपर्यंत वेळेत मदत केल्यास रूग्णाचा जीव वाचू शकतो. तुम्हाला माहीत आहे का भारतात कोणत्या रक्तगटाची लोकं सर्वाधिक आहेत?  

| May 04, 2024, 12:37 PM IST
1/7

एक संस्थेने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात B+ गटातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. भारतातील 38.13 टक्के लोकांचा रक्तगट B+ आहे.

2/7

27.85 टक्के लोकांचा रक्तगट O+ आणि 20.8 टक्के लोकांचा रक्तगट A+ आहे. 

3/7

याशिवाय 8.93 टक्के लोकांचा रक्तगट AB+ आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये बी रक्त गट देखील सामान्य आहे. 

4/7

जागतिक पातळीवर बोलायचे तर, सर्वात सामान्य रक्तगट O आहे. त्याच वेळी, सर्वात कमी सामान्य रक्त गट AB आहे.

5/7

ऑस्ट्रेलियातील 40 टक्के लोक O+ रक्तगटाचे आहेत. A+, B+, AB+ हे अनुक्रमे 31 टक्के, 8 टक्के आणि 2 टक्के रक्तगट आहेत. 

6/7

अमेरिकेत O आणि A रक्तगटाचे लोक 44 आणि 42 टक्के आहेत, तर B आणि AB रक्तगट 10 आणि 40 टक्के आहेत. 

7/7

सौदी अरेबियामध्ये, 48 टक्के लोक 0+ गटाचे, 24 टक्के A+, 17 टक्के B+ आणि 4 टक्के AB+ गटाचे असल्याची माहिती आहे.