राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? 'या' तीन नावांची चर्चा

Team India New Head Coach : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला नवा हेड कोच मिळणार आहे. राहुल द्रविड (Rahul dravid) यांचा कार्यकाळ समाप्त होतोय.

| May 10, 2024, 17:57 PM IST

Who is After Rahul dravid : राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर टीम इंडियाच्या हेड कोचपदी कोणाला संधी मिळणार? असा सवाल विचारला जातोय.

1/8

राहुल द्रविड

राहुल द्रविड यांच्यानंतर नवीन मुख्य प्रशिक्षकाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती जय शहा यांनी दिली आहे.  

2/8

इच्छा असेल तर...

राहुल द्रविडचा कार्यकाळ जूनमध्ये संपणार आहे. मात्र त्यांची इच्छा असल्यास ते या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात, असंही जय शहा यांनी म्हटलं आहे.

3/8

नवा हेड कोच

टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ येत्या जूनमध्ये संपणार आहे. त्यामुळे आता द्रविड यांच्या जागी नवा हेड कोच मिळेल.

4/8

द्रविडनंतर कोण?

मात्र, राहुल द्रविडनंतर कोण? असा सवाल विचारला जात असताना आता तीन दिग्गज खेळाडूंची नावं समोर आली आहेत.

5/8

व्हीव्हीएस लक्ष्मण

राहुल द्रविडनंतर व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक होण्याची दाट शक्यता आहे. द्रविडच्या अनुपस्थितीत तो अनेकदा भारतीय संघाची धुरा सांभाळताना दिसलाय.

6/8

टॉम मुडी

ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर खेळाडू टॉम मुडी देखील या यादीत आहे. डीने अनेकवेळा भारतीय संघाचे प्रमुख बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

7/8

रिकी पॉटिंग

रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिकी पॉटिंगसोबत चर्चा झाली होती. मात्र, राहुल द्रविड यांचं नाव समोर आलं. अशातच आता पाँटिंग पुन्हा रेसमध्ये येण्याची शक्यता आहे.

8/8

प्रशिक्षकाची निवड

फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डींग प्रशिक्षकाची निवड नवीन मुख्य प्रशिक्षकाशी चर्चा केल्यानंतर केली जाईल, अशी माहिती देखील समोर आली आहे.