T20 World Cup 2024 : केएल राहुलला टी-20 वर्ल्ड कप स्कॉडमध्ये संधी का मिळाली नाही?

T20 World Cup 2024 Squad : अखेर टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केलीये. 

| Apr 30, 2024, 18:38 PM IST

KL Rahul Not in T20 World Cup 2024 Squad : बीसीसीआयने बैठकीत धक्कादायक निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज केएल राहुल याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

1/7

विकेटकिपर म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोन विकेटकिपर फलंदाजांना संघात घेतल्याने केएल राहुलचा पत्ता कट झालाय, असं मानलं जातंय. मात्र, केएलला बाहेर का ठेवण्यात आलं? याची 5 प्रमुख कारणं पाहुया...!

2/7

केएल राहुल याची आयपीएलमध्ये चांगली कामगिरी राहिली नाही. आयपीएलमध्ये राहुलने 9 डावात 42 च्या सरासरीने 378 धावा केल्या. त्याचा स्कोर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्यापेक्षा कमी राहिलाय.

3/7

केएल राहुल सध्या लखनऊच्या संघाकडून ओपनिंग करतोय. मात्र, टीम इंडियामध्ये सध्या ओपनिंगची जागा फुल्ल आहे. एकीकडे रोहित शर्मा आणि दुसरीकडे शुभमन आणि यशस्वी, त्यामुळे केएल राहुलचा पत्ता कट झाला.

4/7

केएल राहुलने जर चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर आयपीएलमध्ये फलंदाजी केली असती तर त्याला संधी मिळण्याची शक्यता होती. पंत आणि संजू मिडल ऑर्डरमध्ये खेळतात. त्यामुळे त्यांचा नंबर आधी लागला.

5/7

केएल राहुल आयपीएलमध्ये फिट दिसत नव्हता. दुखापतीतून बाहेर आल्यानंतर देखील केएल राहुलच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. तर दुसरीकडे ऋषभ सिलेक्शनच्या बाबतीत उजवा ठरला.

6/7

वर्ल्ड कपच्या मोठ्या सामन्यात केएल राहुल अपयशी ठरलाय. 2022 मध्ये राहुलने 6 डावात केवळ 128 धावा केल्या होत्या आणि स्ट्राईक रेट फक्त 120 होता. त्यामुळे त्याचं नाव पंत आणि संजूच्या मागे राहिलं.  

7/7

T-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.