T20 World Cup 2024: फॉर्ममध्ये नसताना वर्ल्डकपसाठी हार्दिकची निवड का? सिलेक्टर अजित आगरकरांनी दिलं उत्तर

T20 World Cup 2024: या वर्षी होणाऱ्या T20 वर्ल्डकप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. आता भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माने या प्रकरणाबाबत मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. फॉर्ममध्ये नसताना वर्ल्डकपसाठी हार्दिकची निवड का? सिलेक्टर अजित आगरकरांनी दिलं उत्तर.

| May 03, 2024, 08:55 AM IST
1/6

गुरुवारी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. 

2/6

या पत्रकार परिषदेत रोहित आणि अजित आगरकर यांना हार्दिक पंड्याला टी-20 वर्ल्डकपमध्ये का स्थान दिलं याबाबत प्रश्न विचारण्यात आला. 

3/6

ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या निवडीबाबत आगरकर म्हणाला, 'जोपर्यंत तो फीट आणि उपलब्ध आहे तोवर आम्हाला संघात हार्दिक पांड्या टीममध्ये हवाच होता. 

4/6

हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीबाबत रोहित शर्माने विधान केलं आहे. रोहित म्हणाला, हार्दिक चांगल्या लयीत आहे. तसंच त्याने गोलंदाजीही चांगली केली.

5/6

उपकर्णधारपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. एक क्रिकेटर म्हणून हार्दिक काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहितीये. त्यांला रिप्लेस करणं कठीण आहे, असं आगरकर म्हणाले आहेत.

6/6

आगरकर पुढे म्हणाले की, तो मोठ्या ब्रेकनंतर टीममध्ये येणार आहे. आम्हाला आशा आहे की, तो त्याच्या दुखापतीवर आणि फॉर्मवर काम करतोय.