Married men : विवाहित पुरुष दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या कारणं

Married men likes other people wifes : ज्यावेळी एखादा पुरुष नातेसंबंधासाठी वचनबद्ध होतात तेव्हा त्यांची नजर इकडे तिकडे फिरते कारण त्यांना प्रतिबंधित वाटतं. सर्व पुरुष इतर पुरुषांच्या बायकांचे कौतुक करतात. अनेकदा काही पुरुष केवळ इतर पुरुषांच्या पत्नीकडे पाहतात, मात्र त्यापुढे जात नाहीत. मात्र काही पुरुष यामघ्ये पुढे जातात आणि त्यांच्या मोहकतेवर भाळतात. 

Updated: Sep 2, 2023, 08:22 PM IST
Married men : विवाहित पुरुष दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या कारणं title=

Married men likes other people wifes : रस्त्यावरून चालताना सुंदर स्त्री कडे अनेक पुरुष वळून पाहतात. विवाहित पुरुष हळूच इतर लोकांच्या पत्नीला पाहतात, यामध्ये कोणतीही आश्चर्यकारक गोष्ट नाही. पुरुष विवाहित स्त्रियांकडे हळून टक लावून पाहतात. हे पूर्णपणे आकर्षणाचा परिणाम आहे. 

ज्यावेळी एखादा पुरुष नातेसंबंधासाठी वचनबद्ध होतात तेव्हा त्यांची नजर इकडे तिकडे फिरते कारण त्यांना प्रतिबंधित वाटतं. सर्व पुरुष इतर पुरुषांच्या बायकांचे कौतुक करतात. अनेकदा काही पुरुष केवळ इतर पुरुषांच्या पत्नीकडे पाहतात, मात्र त्यापुढे जात नाहीत. मात्र काही पुरुष यामघ्ये पुढे जातात आणि त्यांच्या मोहकतेवर भाळतात. जे नंतर लग्नात फसवणूक आणि विश्वासघाताचा आधार बनतात. विवाहित पुरुषांना इतर पुरुषांच्या बायका अधिक आकर्षक का वाटतात याची मानसिक कारणं आज आपण पाहूयात.

उतर पुरुषांच्या पत्नींकडे का पाहतात विवाहित पुरुष?

जर पुरुष त्यांच्या वैवाहिक जीवनात असंतुष्ट असतील...

जेव्हा एखादी वचनबद्ध व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात असमाधानी किंवा असंतुष्ट असते त्याची नजर इतर महिलेकडे आकर्षित होतात. ज्यावेळी पुरुष आणि त्याची पत्नी यांच्यात संवाद किंवा समज कमी असतो तेव्हा ही असमाधानाची भावना निर्माण होते. तो असंतोष इथपर्यंत वाढत जातो जिथे तो इतर स्त्रियांकडे पाहून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काही पुरुष पत्नी असून देखील लग्न झालेल्या स्त्रियांना पाहतात.

पुरुषांना काहीतरी वेगळं एक्सपिरीमेंट करायचं असतं...

विवाहित पुरुष जेव्हा काहीतरी प्रयोग करण्याच्या मूडमध्ये असतो तेव्हा तो इतर विवाहित स्त्रियांकडे पाहतो. पुरुषांना नवनवीन प्रयोग करायला आवडतात. मग ते त्यांच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनाबद्दल देखील असू शकतं. यावेळी त्यांना तरूण वेळेच्या गोष्टी देखील आठवतात. ते त्याबद्दल जास्त जबाबदार न राहता काहीही करू शकतात.

आपल्या लग्नाची तुलना करणं...

जे पुरुष दुसऱ्याच्या बायकांकडे पाहतात कारण त्यांना वाटतं की, दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात सर्वकाही योग्य सुरु आहे. असे पुरुष आपल्या वैवाहिक जीवनाची इतरांशी तुलना करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की, इतर लोकांच्या बायका त्याच्या आपल्या पत्नीपेक्षा कितीतरी चांगल्या आहेत. जेव्हा दोन जोडप्यांमध्ये विश्वास, प्रेम आणि सहानुभूतीची कमतरता निर्माण होते, तेव्हा विवाहामध्ये तुलना होऊ लागते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती रिसर्चच्या माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)