Numerology : शनिदेवाचा अंक असलेले 'या' मूलांकाच्या लोकांना एकटेपणा आवडतो

Numerology: अंकशास्त्रात मूलांकाच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव सांगितला जातो. शनि ग्रहाचा अंक हा शांतप्रिय असतो आणि त्याला एकटे राहायला आवडतं. कोणता आहे तो मूलांक जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Apr 30, 2024, 09:38 AM IST
Numerology : शनिदेवाचा अंक असलेले 'या' मूलांकाच्या लोकांना एकटेपणा आवडतो title=
Numerology ank jyotish number 8 mulank People with Saturn number like solitude

Numerology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्रदेखील एक शास्त्र आहे. जे अंक आणि ग्रहांच्या आधारावर व्यक्तीचा स्वभाव, त्याचं भविष्याबद्दल भाकीत करण्यात येतं. अंकशास्त्रानुसार तुमच्या मूलांक हा अतिशय महत्त्वाचा असतो. तो तुमच्या जन्मतारखेनुसार काढला जातो. अंकशास्त्रानुसार 1 ते 8 हे मूलांक असतात. तुमची जन्म तारीख 6, 15 आणि 24 असेल तर यांचा मूलांक हा 6 असतो. या मूलांकानुसार मानवाचा स्वभाव सांगितला जातो. आज आपण अशा मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत जो शनिदेवाचा अंक मानला जातो. (Numerology ank jyotish number 8 mulank People with Saturn number like solitude)

'या' मूलांक असलेल्या लोकांना एकटेपणा आवडतो!

ज्या व्यक्तीची जन्मतारीख ही 8, 17 किंवा 26 असेल त्यांचा मूलांक हा 8 असतो. या मूलांकला रेडिक्स क्रमांक असंही म्हणतात. अंकशास्त्रानुसार 8 मूलांक असलेली लोक अतिशय खास मानली जातात. या मूलांक असलेल्या व्यक्तीचा स्वभाव हा अंतर्मुख असतो. या लोकांना संसाराच्या गजबजाटापासून दूर एकांतात राहायला फार आवडतं. लोकांच्या घोळक्या ही मंडळी बिलकुल रमत नाही. प्रेमापेक्षा या लोकांना शांतता जास्त प्रिय असते. त्यामुळे या मूलांकाची लोक तुम्हाला एकांतात आणि एकाकी जगताना पाहिला मिळतात. 

कामाच्या ठिकाणी कशी असतात ही लोक?

या मूलांक असलेली लोक त्यांच्या कामाप्रती पूर्णपणे समर्पित असतात. ते त्यांचं ध्येय गाठवण्यासाठी कायम लक्षकेंद्रीत राहतात. शिवाय ते कामात मेहनत करायला घाबरत नाहीत. हा मूलांक शनिदेवाचा अंक असल्याने शनिदेव या मूलांकावर प्रसन्न असतात. शिवाय त्यांच्या त्या चांगल्या कर्माची फळंही शनिदेव देतात. ही लोक आव्हानांना घाबरत नाही आणि धैर्याने संकटांचा सामना करतात. 

हा मूलांक शनिदेवाचा असल्याने ही मंडळी कायम हक्क आणि सत्याची बाजू घेतात. तर स्वातंत्र्यप्रेमी असलेली ही लोक कोणावरही कधीही विसबूंन राहत नाहीत. ही लोक महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना आयुष्यातही मोठं यश प्राप्त होतं. शिवाय त्यांच्यामध्ये नेतृत्त्व क्षमता असते. 

जबाबदारी घेण्यापासून पळ काढत नाही!

या मूलांक असलेल्या लोकांची अजून एक खासियत म्हणजे ही लोक जबाबदारी घेण्यापासून पळ काढत नाहीत. ही लोक दृढनिश्चयी आणि शिस्तप्रिय स्वभावाची असतात. कोणतेही काम असतो ते पूर्णपणे त्यात स्वत:ला झोकून देतात आणि त्यासाठी मेहनत करतात. शिवाय ही लोक त्यांच्या वेळेचा पूरेपूर वापर करतात. ते आयुष्यात जे ध्येय डोळेसमोर ठेवतात तेच साध्य करण्यासाठी ते मेहनत घेतात आणि ते पूर्ण करतात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)