Chaitra Purnima 2024 : चैत्र पौर्णिमा 'या' 6 राशींचं नशिब चंद्रासारख चमकणार! सुख आणि सौभाग्य दारी नांदणार

Chaitra Purnima 2024 Horoscope : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला महत्त्व आहे. चैत्र पौर्णिमा अतिशय विशेष असून या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. चैत्र पौर्णिमेला चंद्राल पिंक मून असं म्हणतात. 

नेहा चौधरी | Updated: Apr 23, 2024, 02:44 PM IST
Chaitra Purnima 2024 : चैत्र पौर्णिमा 'या' 6 राशींचं नशिब चंद्रासारख चमकणार! सुख आणि सौभाग्य दारी नांदणार  title=
Pink Full Moon or Chaitra Purnima Destiny will make these 6 zodiac signs shine like the moon Happiness and good luck will come to you Hanuman Jayanti

Chaitra Purnima 2024 Horoscope in Marathi : प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथी आणि अमावस्या तिथी येत असते. धार्मिकदृष्ट्या चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी अतिशय महत्त्वाची आहे. चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती तिथी मानली जाते. चैत्र पौर्णिमा 23 एप्रिलला असून या खगोलीय शास्त्रानुसार पिंक मून म्हणजे गुलाबी चंद्र नावाने ओळखला जातो. यादिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो आणि चंद्राचा आकार मोठा दिसतो. (Pink Full Moon or Chaitra Purnima Destiny will make these 6 zodiac signs shine like the moon Happiness and good luck will come to you Hanuman Jayanti)

ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काही राशींवर हनुमानजींचा विशेष कृपा बरसणार आहे. या लोकांना सुख आणि समृद्धीसह कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहात. कोण आहे या भाग्यशाली राशी जाणून घ्या. 

मेष रास (Aries Zodiac)  

चैत्र पौर्णिमा मेष राशीच्या लोकांसाठी चांगला ठरणार आहे. तुमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास वाढणार आहे. जोडीदारासोबतचं नातं मजबूत होणार आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. 

वृषभ रास (Taurus Zodiac) 

चैत्र पौर्णिमा वृषभ राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या नात्यात प्रेमच प्रेम असणार आहे. जोडीदारासोबतचं नातं मजबूत होणार आहे. भागीदारी व्यवसायातून आर्थिक फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रात मेहनतीचं फळ मिळणार आहे. 

मिथुन रास (Gemini Zodiac)

कामाची जबाबदारी तुमच्यावर वाढणार आहे. ऑफिसच्या कामात तुम्ही व्यस्त असणार आहात. नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी तुम्हाला लाभणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या चांगली नोकरीची ऑफर मिळणार आहे. 

कर्क रास (Cancer Zodiac)   

जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट होणार आहे. प्रेम जीवनात नवीन रोमांचक वळणे येणार आहे. जे रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांचे पार्टनरसोबतचे नातं मजूबत होणार आहे. तुमच्या आवडत्या छंदासाठी वेळ मिळणार असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ व्यतित करणार आहात. 

सिंह रास (Leo Zodiac) 

चैत्र पौर्णिमेमुळे सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरु होणार आहे. आयुष्यातील अडचणी दूर होणार आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहे. नवीन घरात प्रवेश तुमच्यासाठी आनंदी ठरणार आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळणार आहे. कुटुंबात सुख-शांती अबाधित राहणार आहे. 

कन्या रास (Virgo Zodiac)    

जीवनात ऊर्जेची आणि उत्साहाने भरुन निघणार आहे. नवीन कौशल्ये तुम्हाला आनंद मिळणार आहे. सुपर मूनच्या प्रभावामुळे बोलण्यात सौम्यता येणार आहे. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधीमुळे तुम्ही आनंदी असणार आहे. जीवनात नवीन गोष्टी एक्सप्लोर करणार आहात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)