Surya Gochar 2024 : अक्षय्य तृतीयेनंतर ग्रहांचा राजा सूर्यदेव वृषभ राशीत, 'या' लोकांच्या नशिबात कुबेराचा खजिना?

Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेनंतर ग्रहांचा राजा सूर्यदेव हा वृषभ राशीत गोचर करणार आहे. सूर्य गोचर काही राशींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक ठरणार आहे. पण कोणत्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे ते पाहा. 

नेहा चौधरी | Updated: May 8, 2024, 07:33 AM IST
Surya Gochar 2024 : अक्षय्य तृतीयेनंतर ग्रहांचा राजा सूर्यदेव वृषभ राशीत, 'या' लोकांच्या नशिबात कुबेराचा खजिना? title=
Surya Gochar 2024 After Akshaya Tritiya Lord of Planets Surya in Taurus Kubera lot money these zodiac signs people

Surya Gochar 2024 Effects On Zoidac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह एका ठराविक वेळाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रहांचा संक्रमण हे पृथ्वीसह मानवी जीवनावर परिणाम करत असतं. या नऊ ग्रहांचा राजकुमार सूर्यदेव अक्षय्य तृतीयेनंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य हा भाग्य, सन्मान, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासाचा कारक मानला गेला आहे. येत्या 14 मे रोजी मंगळवारी सूर्यदेव वृषभ राशीत स्थानबद्ध झाल्यानंतर विशेष करुन 3 राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. त्यात तुमची रास आहे का? जाणून घ्या. (Surya Gochar 2024 After Akshaya Tritiya Lord of Planets Surya in Taurus Kubera lot money these zodiac signs people)

सिंह रास (Leo Zodiac) 

सूर्यदेव हा सिंह राशीचा स्वामी असल्याने सूर्य गोचर या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तसंच यांच्या कुंडलीत सूर्य देव कर्माच्या घरात स्थित असणार आहे. त्यामुळे व्यवसायाशी संबंधित सर्व लोकांना विशेष फायदा होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. नोकरदार लोकांमध्ये चांगले सामंजस्य असणार आहे. त्यांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे. 

कर्क रास (Cancer Zodiac)   

कर्क राशीच्या लोकांच्या कुंडलीत सूर्यदेव उत्पन्न आणि लाभ स्थानात संक्रमण करणार आहे. त्यामुळे येत्या 14 मे पासून या लोकांना विशेष लाभ होणार आहे. या लोकांचे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. या काळात तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीत पैसे गुंतवणे लाभदायक ठरणार आहे. हा वेळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला 'या' लोकांवर बसरणार शनिदेवाची कृपा, तब्बल 100 वर्षांनंतर शश राजयोग

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण भाग्यशाली सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांची पैशाशी संबंधित कामं मार्गी लागणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होणार आहे. कर्ज आणि पैशाशी संबंधित समस्यांपासून तुम्हाला समाधानकारक मार्ग गवसणार आहे. यावेळी तुम्हाला सर्व भौतिक सुखं लाभणार आहेत. राजकारणात सक्रिय असणारे लोक उच्च स्थान प्राप्त करण्यात यशस्वी होणार आहेत. वाहन आणि मालमत्ता खरेदीची योग्य आहेत. नशिबात वाढ होणार असून तुम्हाला साथ मिळणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)