Sankashti Chaturthi 2024 : एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी? तिथी, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ काय?

Sankashti Chaturthi 2024 : एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी असून विकट संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. यावेळी विशेष योगायोग आल्यामुळे चंद्राला अर्घ्य अर्पण करून त्यांची पूजा केल्यास लाभ मिळणार आहे.

नेहा चौधरी | Updated: Apr 24, 2024, 11:25 PM IST
Sankashti Chaturthi 2024 : एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी? तिथी, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ काय? title=
Vikata Sankashti Chaturthi 2024 in april date puja muhurat moon rising time in marathi

Vikata Sankashti Chaturthi 2024 : प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते. चतुर्थीचं व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वती पुत्र गणेशाला समर्पित आहे. तर चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. चतुर्थीला व्रत करुन रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करुन व्रत सोडल्यास आपल्या आयुष्यातील संकटांचा नाश होतो अशी धर्मात मान्यता आहे. (Vikata Sankashti Chaturthi 2024 in april date puja muhurat moon rising time in marathi )

विकट संकष्टी चतुर्थी कधी आहे? 

पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 27 एप्रिलला सकाळी 8:17 वाजेपासून 28 एप्रिलला सकाळी 8:21 पर्यंत आहे. चतुर्थीचं व्रत हे चंद्राला अर्घ्य देऊन पूर्ण होतं म्हणून संकष्टी चतुर्थीचं व्रत 27 एप्रिलला करायचं आहे. 

संकष्टी चतुर्थीला शुभ योग!

पंचांगानुसार विकट संकष्टी चतुर्थीला परीघ योग आणि ज्येष्ठ नक्षत्राचा शुभ संयोग आहे. यामुळे या व्रताला अधिक महत्त्व प्राप्त झालंय. परीघ योग 27 एप्रिलला सकाळपासून 28 एप्रिलला पहाटे 03.24 पर्यंत असणार आहे. तर ज्येष्ठ नक्षत्र सकाळी सुरू होऊन 28 एप्रिलला पहाटे 04:28 पर्यंत असणार आहे. 

विकट संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय

विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री 10.23 वाजता चंद्रोदय असणार आहे. 

विकट संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत

श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करुन व्रताचे संकल्प घ्यावा. त्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर देव्हाऱ्यातील गणेशाला दुर्वा आणि मोदक अर्पण करा. देशी तुपाचा दिवा लावून आरती करा. गणेश चालिसाचं पठण करा. 

गणेश गायत्री मंत्र

महाकर्णाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ती: प्रचोदयात्। एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।। गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)