झिम्बा्ब्वेच्या 'या' दिग्गज क्रिकेटरवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला!

Zimbabwe Cricketer attack : झिम्बा्ब्वेच्या दिग्गज क्रिकेटरवर बिबट्याने प्राण घातक हल्ला केलाय आणि या हल्यात ते स्वतः आणि त्यांचा कूत्रा दोघं गंभीर जखमी झाले आहेत.

Updated: Apr 25, 2024, 06:08 PM IST
झिम्बा्ब्वेच्या 'या' दिग्गज क्रिकेटरवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला!  title=

Guy Whittall attack : झिम्बा्ब्वेचा पूर्व क्रिकेटर गाय व्हिटाल हा पून्हा एकदा मृत्यूच्या दारातून परत आला आहे. त्यांचा पाळीव कूत्रा चिकारा याने यावेळेस व्हिटाल यांचा जीव वाचवला आहे. जंगलात फिरायला गेले असताना व्हिटाल यांच्यावर जंगलातील एका बिबट्यानेच त्यंच्यावर प्राण घातक हल्ला केलाय, ज्यामुळे त्यांचे पूर्ण शरीर रक्ताने भरले होते.  याआधीही 2013 या साली व्हिटाल यांच्यासोबत असाच एक प्रसंग घडला होता, ज्यामध्ये ते रात्री झोपले असताना त्यांच्या बेडखाली चक्क 8 फूट लांब आणि 150 किलो ग्रॅमचा मगर लपलेला होता आणि विशेष गोष्ट म्हणजे व्हिटाल यांना रात्रभर पाय बेडच्या खाली लटकवून झोपायची सवय आहे. तर त्यांचा चांगल्या भाग्यामुळे ते या भयानक परिस्थितीतून सुद्धा वाचले होते. 

व्हिटाल यांचा झिम्बा्ब्वेमध्ये जंगल सफारीचा व्यवसाय

51 वर्षाय गाय व्हिटाल झिम्बा्ब्वेमधील हूमानी या शहरात जंगल सफारीचा एक लहान व्यवसाय चालवतात. तर एके दिवशी त्यांचा पाळीव कूत्रा चिकारा त्याच्यासोबत ते जंगलात ट्रेकिंगला गेले असताना, एका जंगली बिबट्याने व्हिटाल यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा चावा घेतला होता. तेवढ्यातच त्यांचा कूत्रा चिकारा याने व्हिटाल यांचा बचाव करण्यासाठी बिबट्यावरच हल्ला केला आणि जवाबात बिबट्याने पण त्याला गंभीर जखमी केले होतं.

व्हिटाल यांच्या पत्नीने फेसबुकवर घटनेबद्दल माहिती दिली

गाय व्हिटाल यांची पत्नी हिने काही काळापूर्वीच व्हिटाल यांच्यावर झालेल्या घटनेबद्दल आपल्या फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. त्यांच्या पत्नीने पोस्ट मध्ये लिहिलयं की, 'आज सकाळी व्हिटाल यांच्यावर बिबट्याने घातक हल्ला केलाय, पण व्हिटाल हे भाग्यशाली होते की एवढ्या घातक हल्यानंतर सुद्धा ते वाचले आहेत. त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि वेळेवर योग्य उपचार ही देण्यात आले आहे. यामुळे व्हिटाल यांची स्थिती आता धोक्याबाहेर आहे, तर त्यांच्यावर थोड्या दिवसानंतर सर्जरीसुद्धा केली जाईल. आमचा पाळीव कूत्रा चिकारा याचे जेवढे धन्यवाद मानू तेवढं कमी, कारण त्याच्यामुळेच माझ्या पतींचा प्राण वाचला आहे.  

पाकिस्तानविरूद्ध व्हिटाल यांच्या नावावर एक दमदार शतक

गाय व्हिटाल यांनी झिम्बा्ब्वेकडून एकूण 46 टेस्ट, 147 वनडे खेळून चुकले आहेत, तर झिम्बा्ब्वेकडून खेळताना व्हिटाल यांनी पाकिस्तानविरूद्ध खेळल्या गेलेल्या टेस्टमध्ये दमदार शतकसुद्धा ठोकलं आहे, यानंतर 1995 मध्ये झिम्बा्ब्वेने इतिहासातील पहिला टेस्ट विजय मिळवला होता, त्या संघात गाय व्हिटाल यांचाही समावेश होता.