IPL 2024: चाहते रोहित-रोहित ओरडत असताना हार्दिकने केलं असं की...; व्हिडीओ लीक होताच ट्रोल झाला कर्णधार

IPL 2024: मुंबई इंडियन्सने या सिझनमध्ये 2 सामने खेळले असून एकाही सामन्यांत त्यांना विजय मिळवणं शक्य झालेलं नाही. रोहित शर्माला अशाप्रकारे कर्णधारपदावरून हटवण्यात आलेले चाहत्यांना आवडले नाही.

सुरभि जगदीश | Updated: Mar 29, 2024, 03:57 PM IST
IPL 2024: चाहते रोहित-रोहित ओरडत असताना हार्दिकने केलं असं की...; व्हिडीओ लीक होताच ट्रोल झाला कर्णधार title=

IPL 2024: इंडियन प्रिमीयर लीगला सुरुवात झाली असून सर्वांचं लक्ष्य मुंबई इंडियन्सच्या टीमवर आहे. यंदाच्या आयपीएलपूर्वी मुंबईच्या टीममध्ये अनेक मोठे बदल पहायला मिळाले. यावेळी मुंबईच्या मॅनेजमेंटने गुजरातशी करार करून हार्दिक पंड्याला टीममध्ये घेतलं आणि रोहित शर्माला हटवून त्याच्याकडे कर्णधारपदाची धुराही सोपवली. मॅनेजमेंटच्या या निर्णयाने चाहते मात्र नाराज आहेत, अशातच हार्दिक पंड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

मुंबई इंडियन्सने या सिझनमध्ये 2 सामने खेळले असून एकाही सामन्यांत त्यांना विजय मिळवणं शक्य झालेलं नाही. रोहित शर्माला अशाप्रकारे कर्णधारपदावरून हटवण्यात आलेले चाहत्यांना आवडले नाही. या प्रकारानंतर रोहितच्या चाहत्यांकडून हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. अशावेळी सामन्यानंतर हार्दिक पांड्याला स्टेडियममध्ये चाहत्यांकडून ट्रोल करण्यात आलं. यावेळी हार्दिकने दिलेल्या रिएक्शनचा कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हार्दिक पंड्याचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात शेअर केली जातेय. ज्यामध्ये हार्दिक पांड्या काही वेळ आकाश अंबानीशी बोलताना दिसला, त्यानंतर जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये परत जाऊ लागला तेव्हा स्टेडियममधील चाहत्यांनी रोहित-रोहित असा आरडाओरडा सुरू केला. यावेळी हार्दिकने रागाच्या भरात स्टेडियममधील फेसिंगवर हात मारताना दिसला. त्याची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली असून आता तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कर्णधार आणि खेळाडू म्हणूनही हार्दिक फेल

दुखापतीनंतर बऱ्याच कालावधीनंतर मैदानात कमबॅक केलेल्या हार्दिक पांड्याला आयपीएलच्या सिझनमध्ये साजेसा खेळ करता आला नाही. यावेळी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये त्याला विशेष कामगिरी करता आलेली नाही. हार्दिकने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 4 ओव्हर्समध्ये 46 रन्स दिले. दुसरीकडे मोठ्या सनरायझर्सविरूद्ध पाठलाग करताना 20 बॉल्सचा सामना केल्यानंतर तो केवळ 24 रन्सचं करू शकला. त्यामुळे कर्णधार आणि खेळाडू म्हणून हार्दिक फेल ठरताना दिसतोय.