'वो वापिस आ गए हैं' युजवेंद्र चहलच्या निवडीनंतर धनश्री वर्माची पोस्ट चर्चेत

T20 World Cup : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. 15 खेळाडूंच्या संघात फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. संघ जाहीर झाल्यानंतर चहलची पत्नी धनश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

राजीव कासले | Updated: Apr 30, 2024, 05:49 PM IST
'वो वापिस आ गए हैं' युजवेंद्र चहलच्या निवडीनंतर धनश्री वर्माची पोस्ट चर्चेत title=

T20 World Cup : इंडियन प्रीमिअर लीगनंतर जून महिन्यात टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. 1 मे पासून अमेरिका (America) आणि वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) टी20 वर्ल्ड कप खेळवली जाणार असून यासाठी बीसीसीआयने (BCCI) पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि युजवेंद्र चहल यांना संधी देण्या आली आहे. भारतात गेल्यावर्षी खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संधी देण्यात आली नव्हती. पण आता टी20 वर्ल्ड कपसाठी चहलने आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. चहलची टीम इंडियात निवड झाल्यानंतर त्याची पत्नी धनश्री वर्माने एस पोस्ट केली असून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.

धनश्री वर्माची पोस्ट चर्चेत
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हे कपल सोशल मीडियावर चांगलंच सक्रिय असतं. दोघंही एकमेकांना आपापल्या कामात सपोर्ट करत असतात. आता धनश्रीने युजवेंद्र चहलसाठी इन्स्टाग्रामवर एक खास स्टोरी शेअर केली आहे. धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर चहलचा एक फोटो शेअर केला आहे. याला तीने एक कॅप्शन दिलं असून त्यात तीने 'वो वापिस आ गए है' असं लिहिलंय.

भारताचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलनने 22 एप्रिलला आयपीएलमध्ये 200 विकेट घेत इतिहास रचला होता. युजवेंद्र चहलने आतापर्यंत 80 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 25.09 च्या अॅव्हरेजने 96 विकेट घेतल्या आहेत. 2022 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चहलला संघात संधी देण्यात आली. पण त्याला एकही सामना खेळवण्यात आला नव्हता. एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये चहलला संधी न मिळण्यावरुन निवड समितीवर बरीच टीका झाली होती. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने चहलला मोठ्या स्पर्धेत नक्कीच संधी मिळेल असे संकेत दिले होते. 

टीम इंडियाने 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर टीम इंडियाला पुन्हा अशी कामगिरी करता आलेली नाही. आता टी20 वर्ल्ड कपचा हा नववा हंगाम असून यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत स्पर्धा खेळवली जाणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या खेळपट्टीवर युजवेंद्र चहलची फिरकी संघासाठी फायदेशीर ठरणार आहे. 

टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उप-कप्तान), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज.