धोनीसारखा रुम न मिळाल्याने CSK संघ सोडला? सुरेश रैनाने अखेर 4 वर्षांनी केला खुलासा, 'कच्छे गँगने...'

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) 2020 मध्ये मध्यातच संघाची साथ सोडून दुबईतून (Dubai) निघाला होता. आपल्याला धोनीसारखा (MS Dhoni) रुम न मिळाल्याने सुरेश रैना नाराज असल्याचं बोललं जात होतं. पण आता सुरेश रैनाने सत्यस्थिती सांगत खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 22, 2024, 01:42 PM IST
धोनीसारखा रुम न मिळाल्याने CSK संघ सोडला? सुरेश रैनाने अखेर 4 वर्षांनी केला खुलासा, 'कच्छे गँगने...' title=

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) 2020 मध्ये मध्यातच संघाची साथ सोडून दुबईतून (Dubai) निघाला होता. यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. पहिल्या सामन्याआधीच सुरैश रैना माघारी भारतात परतला होता. आपल्याला धोनीसारखा (MS Dhoni) रुम न मिळाल्याने सुरेश रैना नाराज असल्याचं बोललं जात होतं. पण आता सुरेश रैनाने सत्यस्थिती सांगत खुलासा केला आहे. 

2020 मध्ये कोविडमुळे आयपीएल स्पर्धा सहा महिन्यांसाठी पुढे ढकलली होती. यानंतर ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अत्यंत कडक नियमांचं पालन करत ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. सर्व संघांना बायो-बबल आणि क्वारंटाइनचं पालन करावं लागत होतं. चेन्नई संघ युएईत दाखल झाल्यानंतर काही दिवसांत सुरेश रैनाने संघ माघारी परतला होता. आपल्या हॉटेल रुममुळे सुरेश रैना नाराज असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. 

यादरम्यान संघमालक एन श्रीनिवास यांच्या विधानाने आगीत तेल ओतण्याचं काम केलं होतं. “अजून हंगामाला सुरुवात झालेली नाही आणि रैनाला नक्कीच कळेल की तो काय गमावत आहे. तो निश्चितच सर्व पैसे (प्रति हंगाम 11 कोटी) तो गमावणार आहे. मला असं वाटतं की जर तुम्ही नाखूष असाल किंवा आनंदी नसाल तर परत जा. मी कोणालाही काहीही करायला भाग पाडत नाही. कधी कधी यश तुमच्या डोक्यात येते,” असं श्रीनिवासन यांनी 2020 मध्ये आउटलुकला सांगितलं होतं. 

“क्रिकेटर्स हे जुन्या काळातील स्वभावाच्या अभिनेत्यांसारखे आहे. चेन्नई सुपर किंग्ज हे नेहमीच एका कुटुंबासारखे राहिले आहे आणि सर्व वरिष्ठ खेळाडू एकत्र राहायला शिकले आहेत,” असंही त्यांनी म्हटलं होतं. पण अखेर सुरेश रैनाने नेमकं काय झालं होतं याचा खुलासा केला आहे. वैयक्तिक गोष्टीमुळे आपण आयपीएलमधून बाहेर पडलो होतो आणि बायो-बबलमुळे पुन्हा सहभागी होणं शक्य नव्हतं असं त्याने म्हटलं आहे. 

'कच्छे गँगने माझ्या काकांचं कुटुंब ठार केलं'

सुरेश रैनाने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत कच्छे गँगने माझ्या काकांचं कुटुंब ठार केलं होतं असा खुलासा केला. तो म्हणाला की, "माझ्या कुटुंबात शोककळा पसरली होती. माझ्या काकाच्या कुटुंबात मृत्यू झाले होते. गुंडांच्या एका गटाने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली होती. पठाणकोटमध्ये हे घडले होते. म्हणून मी तिथे गेलो. पण आयपीएलमध्ये बायो-बबल होता, ज्यामुळे तुम्ही परतू शकत नव्हता. माझं कुटुंब फार तणावात होतं. मी विचार केला की, क्रिकेट ही प्राथमिकता नसून ते नंतरही खेळू शकतो. त्यावेळी कुटुंब महत्त्वाचं होतं". आपण धोनीला याची माहिती दिली होती असा खुलासाही सुरेश रैनाने यावेळी केला. 

""होय, मी धोनी आणि संघ व्यवस्थापनाला सगळं सांगितलं होतं. कुटुंब हे नेहमीच प्रथम येतं. मग मी परतलो, आणि 2021 चा हंगाम खेळलो. आम्ही ट्रॉफी जिंकली. पण त्याच्या मागील वर्षी, कुटुंब प्रंचड तणावात होतं. करोनामुळे ते सर्व आधीच नैराश्यात होते आणि नंतर हे घडले. मला वाटलं की मी घरी जावं आणि माझ्या कुटुंबासोबत राहावं,” असं सुरेश रैना म्हणाला.

सुरेश रैना पहिल्या हंगामापासून चेन्नई संघाचा भाग राहिला आहे. चेन्नईच्या यशात त्याचाही वाटा आहे. सुरेश रैना खेळत असताना चेन्नई संघ नऊ वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला होता. यामधील 4 वेळा त्यांनी स्पर्धा जिंकली. रैनाने सीएसकेसाठी 200 सामने खेळले. आजही 200 सामन्यांमध्ये 39.40 च्या सरासरीने 5529 धावा करून तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.