बुमराहचा यॉर्कर आहे की बंदुकीची गोळी? क्षणात दांड्या गुल.. हा Video तुम्ही पाहिलात का

Jasprit Bumrah Yorker : मुंबई इंडियन्सने चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्सचा 9 धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातला मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय ठरलाय. मुंबईच्या या विजयाचा हिरो ठरला तो यॉर्कर किंग जसप्रती बुमराह

राजीव कासले | Updated: Apr 19, 2024, 02:30 PM IST
बुमराहचा यॉर्कर आहे की बंदुकीची गोळी? क्षणात दांड्या गुल.. हा Video तुम्ही पाहिलात का title=

Jasprit Bumrah Lethal Yorker Video : आयपीएल 2024 च्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) पंजाब किंग्सचा  (PBKS) 9 धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय ठरला आहे. या विजयाबरोबर मुंबई इंडियन्सने पॉईंटटेबलमध्येही सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला तो यॉर्कर किंग जसप्रीत बुमहार (Jasptrit Bumrah). या सामन्यात बुमराहने तीन विकेट घेतल्या. बुमराहच्या या कामगिरीमुळे तो प्लेअर ऑफ द मॅचचाही मानकरी ठरला. 

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात जसप्रीच बुमराहची भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली. विशेषत: त्याच्या एका यॉर्करने पंजाब किंग्सचा फलंदाज राइली रुसोचा क्लीन बोल्ड उडवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

बुमराहचा यॉर्कर आहे की बंदुकीची गोळी? 
सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहच्या या घातक यॉर्करची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. जसप्रीत बुमराहचा हा यॉर्कर पाहून क्रिकेट चाहते हा यॉर्कर आहे की बंदुकीची गोळी अशी प्रतिक्रिया देतायत. जसप्रीत बुमराहच्या या यॉर्करचा रुसोकडे कोणतंही उत्तर नव्हतं. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच चेंडू स्टम्पवर आदळला आणि स्टम्प अक्षरश: उखडले गेले. या यॉर्करने पंजाब किंग्सला बॅकफूटला ढकललं. राइली रुसो 3 चेंडूत अवघी एक धाव करु शकला.  पंजाबाचा हुकमी फलंदाज राइलो रुसो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. तर मुंबईतर्फे बुमराह दुसरं षटक टाकण्यासाठी आला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर बुमराहने रुसोच्या दांड्या गुल केल्या.

बुमराहने घेतल्या तीन विकेट
पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पंजाबचे शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा मुंबईच्या इतर गोलंदाजांची धुलाई करत असताना एकट्या बुमराहने त्यांच्यावर लगाम घातला. बुमराहने चार षटकात केवळ 21 धावा देत तीन विकेट घेतल्या.

बुमराहबरोबरच गेराल्ड कोएत्झीनेही चार षटकात 32 धावा देत तीन विकेट घेतल्या. तर आकाश मधवाल, हार्दिक पांड्या आणि श्रेयस गोपालने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

बुमराहची आयपीएलमधली कामगिरी
यंदाच्या आयपीएलमध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर आहे. बुमराहने सात सामन्यात तब्बल 13 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने केवळ 167 धावा दिल्यात. 21 धावात 5 विकेट ही त्याची यंदाच्या आयपीएलमधली सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. बुमराह आयपीएलमध्ये आतापर्यंत 127 सामने खेळलाय. यात त्याने तब्बल 158 विकेट घेतल्यात. यात पाच विकेट घेण्याची कामगिरी त्याने दोनवेळा केलीय. तर 10 धावात पाच विकेट ही त्याची आयपीएलमधली सर्वोत्तम कामगिरी ठरलीय.