आयपीएलमध्ये शुभमन गिलने कोरलं शंभराव्या शतकावर नाव, सर्वाधिक Centuries 'या' फलंदाजाच्या नावावर

IPL 2024 Centuries : आयपीएल 2024 खऱ्या अर्थाने रेकॉर्डब्रेक ठरतंय. सर्वाधिक धावांचा विक्रम यंदाच्या आयपीएलमध्ये मोडला गेलाय. कमी सामन्यात हजाराहून अधिक षटकारांचा महाविक्रमही रचाल गेलाय. आता आयपीएलमधल्या शंभराव्या शतकाची नोंदही यंदाच्या हंगामातच झालीय.

राजीव कासले | Updated: May 10, 2024, 10:25 PM IST
आयपीएलमध्ये शुभमन गिलने कोरलं शंभराव्या शतकावर नाव, सर्वाधिक Centuries 'या' फलंदाजाच्या नावावर title=

IPL 2024 Centuries : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा 2024 हा हंगाम फलंदाजासाठी रेकॉर्डब्रेक ठरतोय. सर्वाधिक धावांचा विक्रम यंदाच्या आयपीएलमध्ये रचला गेला. सनरायजर्स हैदाराबादने 20 धावांत तब्बल 287 धावा केल्या. त्याआधी याच हंगामात हैदराबादनेच 277 धावांचा विक्रम केला होता. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात तब्बल चारवेळा 250 हून अधिक धावा झाल्या आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कमी सामन्यात 1000 हून अधिक षटकारांची नोंद झालीय, आयपीएल 2022 मध्ये 1062 तर आयपीएल 2023 मध्ये 1024 षटकार लगावले गेले होते. यंदा 57 सामन्यातच हजाराहून अधिक षटकार झालेत. आता आयपीएल 2024 मध्ये आणखी एक विक्रम झालाय. आयपीएलमध्ये शतकांची सेंच्युरी (100 Centries in IPL) झालीय.

शुभमन गिलने रचला इतिहास
आयपीएलमध्ये 59 व्या  सामन्यात चेन्नई किंग्सविरुद्ध खेळताना गुजरात टायटन्सने 232 धावांचा डोंगर रचला. यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) 104 धावांची दमदार खेळी केली. गुजरातसाठी हे शतक खास होतं. पण हे शतक आणखी एका कारणासाठी महत्त्वाचं होतं. गिलच्या या शतकाबरोबरच आयपीएलमध्ये शतकांची सेंच्युरी झालीय. शंभराव्या शतकावर गिलने आपलं नाव कोरलं. गिलबरोबरच सलामीचा फलंदाज साई सुदर्शननेही (Sai Sudardhan) शतक ठोकलं.  साई सुदर्शन 103 धावांवर बाद झाला. त्याने 51 चेंडूत 7 षटकार आणि 5 चौकार लगावले.

आयपीएलमध्ये सर्वाधक सेंच्युरी
आयीएल 2008 ते आयपीएल 2024 या सोळा वर्षांच्या हंगामात शंभर शतकांचा प्रवास पूर्ण झालाय. विशेष म्हणजे यात सर्वाधिक शतकांचा विक्रम भारतीय फलंदाजाच्याच नावावर आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं केलीत. विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलमध्ये आतापर्यंत 249 सामने खेळला असून यात त्याच्या नावार सर्वाधिक 8 शतकं जमा आहेत. विराटने आयपीएलमध्ये 55 अर्धशतकं केलीत. सर्वाधिक शतकांचा यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जोस बटलर आहे. जोस बटलरने आयपीएलमध्ये सात शतकं ठोकलीत. 

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेल आहे. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 6 शतकं केलीत. यासाठी तो 142 सामने खेळलाय. गेलच्या नावावर आयपीएलमध्ये 31 अर्धशतकंही जमा आहेत. चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल असून गिलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 4 शतकं केलीत. गिल आयपीएलमध्ये 103 सामने खेळलाय.