KKR vs DC highlights, IPL 2024 : इडन गार्डनवर कोलकाताची 'बादशाहत', दिल्लीचा 7 विकेट्सने पराभव

KKR vs DC Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यात आज कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे.   

KKR vs DC highlights, IPL 2024 : इडन गार्डनवर कोलकाताची 'बादशाहत', दिल्लीचा 7 विकेट्सने पराभव

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live Score in Marathi: आयपीएल 2024 मध्ये कोलकाता आणि दिल्ली हे दोघं संघ दुसऱ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. पहिल्यांदा जेव्हा हे दोघं संघ भिडले होते, तेव्हा केकेआरने, दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल 106 धावांनी धुव्वा उडवला होता. तर आता बघण्यायोग्य असणार की, आज ऋषभ पंतची दिल्ली आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का?

29 Apr 2024, 22:52 वाजता

15 ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर आहे 142-3. वेंकटेस अय्यर हा 19 धावांवर खेळत असून, श्रेयस अय्यर हा 27 धावांवर खेळतोय आणि केकेआरला जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे.

29 Apr 2024, 22:28 वाजता

दिल्लीचा युवा गोलंदाज लिझाड विलियम्सन याने 10 व्या ओव्हरमध्ये रिंकू सिंगला 11 धावांवर आउट केलं आहे. तिसऱ्या विकेटनंतर मैदानात वेंकटेश अय्यर हा फलंदाजीसाठी आला आहे.

29 Apr 2024, 22:14 वाजता

अक्षर पटेल याने 7 व्या ओव्हरमध्ये केकेआरचा इन फॉर्म फलंदाज सुनील नरेन याला 15 धावांवर बाद केलं आहे. पहिल्या विकेटनंतर फलंदाजीसाठी मैदानात रिंकू सिंग आला आहे.

29 Apr 2024, 22:07 वाजता

6 व्या ओव्हरमध्ये केकेआरचा धाकड ओपनर फिल सॉल्ट याने फक्त 26 बॉलमध्ये 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आपलं ताबडतोब अर्धशतक पूर्ण केलं आहे.

29 Apr 2024, 22:04 वाजता

5 ओव्हरच्या समाप्तीनंतर केकेआरचा स्कोर आहे 61-0. फिल सॉल्ट हा 42 धावांवर खेळतोय, तर सुनील नरेन हा 15 धावांवर खेळत आहे. 5 ओव्हरनंतर कोलकाताला जिंकण्यासाठी 90 बॉलमध्ये 93 धावा लागत आहेत.

29 Apr 2024, 21:22 वाजता

20 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी निराशाजनक प्रदर्शन केलं आहे. दिल्लीकडून फक्त ऋषभ पंत आणि कुलदिप यादव या दोघांनी 20 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पंतने 27, तर कुलदीपने नाबाद 31  धावा केल्या आहेत. याउलट केकेआरच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केलयं चक्रवर्तीच्या खात्यात 3, हर्षित आणि वैभवच्या खात्यात प्रत्येकी 2-2, तर स्टार्क, आणि नरेन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतलेल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने, केकेआरला 154 धावांचे आव्हान दिलं आहे.

आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, केकेआरचे फलंदाज हे टार्गेट सोप्या पद्धतीने चेस करणार की, दिल्लीचे गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या कौश्ल्याने हा सामना आपल्या खिशात टाकणार?  

29 Apr 2024, 20:51 वाजता

15 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोर 112-8 असा आहे. वरूण चक्रवर्तीने 15 व्या ओव्हरमध्ये कुशाग्र याला फक्त 1 धावावर आउट केलं आहे..

29 Apr 2024, 20:44 वाजता

सुनील नरेनने 14 व्या ओव्हरमध्ये दिल्लीचा ऑलराउंडर अक्षर पटेल हा 15 धावांवर आउट केलं आहे. कुलदीप यादव हा सातव्या विकेटनंतर फलंदाजीसाठी आला आहे.

29 Apr 2024, 20:38 वाजता

13 व्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक झटका लागला आहे. वरूण चक्रवर्तीने 13 व्या ओव्हरमध्ये ट्रिस्टन स्टब्सला तंबूत परत पाठवलं आहे. सहाव्या विकेटनंतर कुमार कुशाग्र हा फलंदाजीसाठी आला आहे.

29 Apr 2024, 20:31 वाजता

वरूण चक्रवर्तीच्या 11 व्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत हा 27 धावांवर बाद झाला आहे. या विकेटनंतर दिल्लीच्या समस्या वाढल्या आहेत, तर पाचव्या विकेटनंतर ट्रिस्टन स्टब्स हा फलंदाजीसाठी आलाय.