KKR vs PBKS highlights, IPL 2024 : इडन गार्डनवर पंजाबच्या फलंदाजांचे तांडव! 262 धावांचे रेकॉर्ड ब्रेक आव्हान केलं चेस

आयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात आज इडन गार्डनवर कमालच्या फॉर्ममध्ये असलेली कोलकात नाइट रायडर्सविरूद्ध पंजाब किंग्सचा (Kolkata Knight Riders vs Punjab Kings) सामना रंगणार आहे. 

KKR vs PBKS highlights, IPL 2024 : इडन गार्डनवर पंजाबच्या फलंदाजांचे तांडव! 262 धावांचे रेकॉर्ड ब्रेक आव्हान केलं चेस

Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live Score in Marathi: आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये खेळत आहे, तर पंजाब किंग्सच्या संघाचा फॉर्म हा थोडा डगमगलेला आहे. पंजाबचा संघ अजूनही आपली गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये केकेआर ही  10 पॉइंट्स सोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पंजाबचा संघ 4 पॉइंट्स सोबत नवव्या स्थानावर आहे. तर आज बघण्यायोग्य गोष्ट असणार की, केकेआर आज पण आपला बेधडक खेळ खेळणार की, पंजाब किंग्स आज बाजी मारणार?

26 Apr 2024, 20:52 वाजता

15 ओव्हरनंतर कोलकाता नाईट रायडर्सचा स्कोर 190-2 असा आहे. आंद्रे रसल हा 14 धावावंर, तर वेंकटेश हा 22 धावांवर खेळत असून, दोघं फलंदाज चांगली भागीदारी बनवण्यात यशस्वी झाले आहेत.

26 Apr 2024, 20:41 वाजता

पंजाबचा कॅप्टन सॅम करन याने घातक ठरत असणाऱ्या फिल सॉल्ट याला 75 धावांवर आउट केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर आंद्रे रसल हा फलंदाजीसाठी आलाये.

26 Apr 2024, 20:31 वाजता

राहूल चहरने 11 व्या ओव्हरमध्ये सुनील नरेनला 71 धावांवर बाद झाला आहे. पहिल्या विकेटनंतर वेंकटेश अय्यर हा फलंदाजीसाठी आला आहे. 

26 Apr 2024, 20:20 वाजता

9 व्या ओव्हरमध्ये केकेआरचा दुसरा ओपनर फिल सॉल्ट याने पण 25 बॉलमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. तर 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर केकेआरचा स्कोर 137-0 असा आहे.

26 Apr 2024, 20:13 वाजता

8 व्या ओव्हरमध्ये कोलकाताच्या घातक ऑलराउंडर सुनील नरेन याने फक्त 23 बॉलमध्ये 8 चौकार 2 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. 

26 Apr 2024, 19:55 वाजता

5 ओव्हरनंतर केकेआरकडून नरेन आणि सॉल्ट यांनी दमदार सुरूवात केला आहे. सॉल्ट हा 30 धावांवर, तर नरेन हा 37 धावांवर खेळत आहे. 5 ओव्हरनंतर कोलकाताचा स्कोर 70-0 असा आहे.

26 Apr 2024, 19:07 वाजता

KKR vs PBKS टॉस अपडेट - पंजाबचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

PBKS प्लेइंग 11 -

जॉनी बेअरस्टो, सॅम करन (C), रायली रूसो, जितेश शर्मा (W), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

KKR प्लेइंग 11 -

फिलिप सॉल्ट (W), सुनील नारायण, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (C), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा

 

26 Apr 2024, 18:52 वाजता

KKR vs PBKS Head to head :

आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स हो दोघं संघ एकूण 32 वेळेस आमनेसामने भिडले आहेत. तर यामधुन केकेआरने 21 वेळा बाजी मारली आहे. तर पंजाब किंग्सने यातून 11 वेळेस बाजी मारली आहे. आज कोणता संघ आपलं वर्चस्व दाखवणार हे बघण्यायोग्य ठरणार आहे?