CSK vs LSG highlights, IPL 2024 : चेपॉकतच्या मैदानात सर्वात मोठी रन चेस, लखनऊचा 6 विकेट्सने विजय

CSK vs LSG Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात आज चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ससमोर लखनऊ सुपर जाएंट्सचे (Chennai Super Kings vs Lucknow Supergiants) आव्हान असणार आहे. 

CSK vs LSG highlights, IPL 2024 : चेपॉकतच्या मैदानात सर्वात मोठी रन चेस, लखनऊचा 6 विकेट्सने विजय

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live Score in Marathi:  ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारी सीएसके या आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. पॉइंट्स टेबलमध्ये 7 सामन्यात चेन्नई 8 पॉइंट्ससोबत चौथ्या क्रमांकावर आहे, तर के एल राहूलच्या कॅप्टन्सीखाली खेळणारी लखनऊ सुपर जाएंट्स ही 7 सामन्यात 4 मॅच जिंकून 8 पॉइंट्ससोबत पाचव्या क्रमांकावर आहे. तर आज बघण्यायोग्य गोष्ट असणार की, लखनऊ आज चेन्नईच्या होमग्राउंडवर विजय मिळवू शकते की नाही, कारण या सिजमनध्ये आतापर्यंत आपल्या होमग्राउंडवर चेन्नई सुपर किंग्सने एकही सामन्यात पराभव पत्कारलेला नाहीये, अशातच आज कोणता संघ वरचढ ठरणार हे यावर साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.  

23 Apr 2024, 23:18 वाजता

लखनऊच्या मार्कस स्टॉयनिसने 56 बॉलमध्ये 9 चौकार आणि 5 षटकारांसोबत आपलं तूफानी शतक पूर्ण केलयं. लखनऊला या स्थितीतून 12 बॉलमध्ये 32 रन लागत आहेत.

23 Apr 2024, 22:55 वाजता

ओव्हरनंतर लखनऊ सुपर जाएंट्सचा स्कोर 137-3 असा आहे. मार्कस स्टॉयनिसने लखनऊच्या फलंदाजीची एक बाजू सांभाळून ठेवली आहे.स्टॉयनिस हा 86 धावावर खेळतोय, तर त्याचे साथ पूरन हा 15 धावांवर देत आहे.

23 Apr 2024, 22:33 वाजता

महिशा पथिरानाने लखनऊला देवदत्त पडिकलच्या स्वरूपात तिसरा धक्का दिला आहे. पडिकल हा 13 धावा करून आउट झाला आहे. तर आता निकोलस पूरन हा फलंदाजीसाठी आला आहे.

23 Apr 2024, 22:23 वाजता

10 ओव्हरनंतर लखनऊ सुपर जाएंट्सचा स्कोर 83-2 असा आहे. 10 व्या ओव्हरमध्येच मार्कस स्टॉयनिसने 26 बॉलमध्ये आपलं ताबडतोब अर्धशतक पूर्ण केलं आहे. स्टॉयनिसच्या या इनिंगमध्ये 6 चौकार आणि 2 षटकार सामील आहेत. तर दुसऱ्या बाजूला पडिकल हा 12 धावांवर खेळत आहे.

23 Apr 2024, 22:01 वाजता

पाचव्या ओव्हरमध्ये मुस्ताफिजूरच्या गोलंदाजीवर लखनऊचा कॅप्टन के एर राहूल हा 16 धावांवर आउट झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर फलंदाजीसाठी देवदत्त पडिकल हा आलेला आहे, तर लखनऊचा स्कोर 5 ओव्हरनंतर 33-2 असा आहे.

23 Apr 2024, 21:39 वाजता

दिपक चाहरने पहिल्याच ओव्हरमध्ये लखनऊचा धाकड फलंदाज क्विंटन डि कॉक याला शून्यावर आउट केलं आहे. पहिल्या विकेटनंतर मार्कस स्टॉयनिस हा फलंदाजीसाठी आला आहे.

23 Apr 2024, 21:25 वाजता

20 ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्सने, लखनऊ सुपर जाएंट्ससमोर 211 धावांचे आव्हान दिलं आहे.  चेन्नईकडून उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन झाले आहे. सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 108 धावांची कप्तानी इनिंग  खेळलेली आहे. शिवम दुबे यानेसुद्धा 27 बॉलमध्ये 66 धावांची ताबडतोब खेळी खेळलेली आहे. या दोघं इनिंगमुळे चेन्नई 210-4 या स्थितीत पोहचली आहे. लखनऊकडून गोलंदाजीत मॅट हेनरी, मोहसिन खान आणि यश ठाकूर या तिघं गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

आता लखनऊ, चेन्नईला त्यांच्या होमग्राउंडवर पराभूत करणार, की सीएसके आपले दमदार प्रदर्शन दाखवत लखनऊचा धुव्वा उडवणार? हे बघणं रंजक ठरणार आहे.

23 Apr 2024, 21:07 वाजता

18 व्या ओव्हरमध्ये सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडने 56 बॉलमध्ये 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आपलं दमदार शतक पूर्ण केलं आहे. गायकवाडच्या या शतकामुळे चेन्नईचे लक्ष आता मोठ्या धावसंख्येवर आहे. 

23 Apr 2024, 20:45 वाजता

15 ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोर 135-3 असा आहे. ऋतुराज गायकवाड हा 85 धावांवर नाबाद असून शानदार फलंदाजी करतोय त्याने सीएसकेच्या फलंदाजीची एक बाजू सांभाळून ठेवली आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवम दुबे हा गायकवाडचे साथ देत 19 धावांवर खेळत आहे. 

23 Apr 2024, 20:31 वाजता

मोहसिन खानच्या 12 व्या ओव्हरमध्ये रविंद्र जडेदा हा 16 धावांवर तंबूत परतला आहे. जडेजाने आज 19 बॉलमध्ये केवळ 16 रन केले आहेत, तर तिसऱ्या विकेटनंतर शिवम दुबे हा फलंदाजीसाठी आला आहे.