रोमांचक सामन्यात गुजरातचा दणदणीत विजय, राशिद खान विजयाचा हिरो, राजस्थानचा पहिला पराभव

RR vs GT Live Score, IPL 2024 : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवला गेला होता. त्यात गुजरातने विजय मिळवला आहे.

रोमांचक सामन्यात गुजरातचा दणदणीत विजय, राशिद खान विजयाचा हिरो, राजस्थानचा पहिला पराभव

RR vs GT Live Score in Marathi : आयपीएलचा 24 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरमध्ये खेळला गेला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि राजस्थानला प्रथम फलंदाजीची संधी दिली. संजू सॅमसनच्या संघाने गुजरातसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने तीन विकेट्स राखून विजय मिळवला.

10 Apr 2024, 23:52 वाजता

अखेरच्या 2 बॉलवर 4 धावांची गरज असताना आवेश खानच्या बॉलवर राहुल तेवतियाने फटका मारला अन् 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेत असताना राहुल बाद झाला. बटलरने शानदार फिल्डिंग केली. त्यानंतर आता एका बॉलवर 2 धावांची गरज होती. त्यावेळी स्टाईकवर असलेल्या राशिद खानने खणखणीत फोर मारला अन् गुजरातने सामना खिशात घातला.

10 Apr 2024, 23:37 वाजता

गुजरातला अखेरच्या ओव्हरमध्ये 15 धावांची गरज आहे. राहुल तेवतिया आणि राशिद खान मैदानात आहेत.

10 Apr 2024, 23:10 वाजता

युझी चहलने गुजरातचा कॅप्टन शुभमन गिल याला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं अन् गुजरातला अडचणीत टाकलं आहे. शुभमन गिल 44 बॉलमध्ये 72 धावा करून बाद झाला.

10 Apr 2024, 23:03 वाजता

गुजरातला चौथा धक्का बसला आहे. आक्रमक खेळीसाठी पाठवलेला विजय शंकर चहलच्या फिरकीत अडकला अन् 10 बॉलमध्ये 16 धावा करत बाद झाला. युझी चहलने त्याची विकेट काढली.

10 Apr 2024, 22:43 वाजता

वेड बाद झाल्यावर मैदानात आलेल्या अभिनव मनोहरला केवळ 1 धाव करता आली. कुलदीप सेनने त्याच्या त्रिफळा उडवला.

10 Apr 2024, 22:41 वाजता

पावसामुळे थांबलेला सामना पुन्हा सुरू झाल्यावर पहिल्याच बॉलवर कुलदीप सेनने मॅथ्यू वेडला तंबूत धाडलं. त्याने केवळ 4 धावा केल्या.

10 Apr 2024, 22:38 वाजता

पाऊस थांबला, गुजरातच्या डावाला पुन्हा सुरूवात, टार्गेट होतं तेच...

10 Apr 2024, 22:36 वाजता

गुजरातने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट्सच्या बदल्यात 77 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता गुजरातला सामना जिंकायचा असेल तर 10 ओव्हरमध्ये 120 धावा कराव्या लागणार आहे.

10 Apr 2024, 22:34 वाजता

सामना अखेरच्या मोडमध्ये आला असताना आता पावसाने मोठा घोळ घातला आहे. पावसामुळे सामना थांबवावा लागला आहे. 

10 Apr 2024, 22:29 वाजता

कुलदीप सेनने गुजरातला पहिला धक्का दिला. कुलदीपने पहिल्याच षटकात साई सुदर्शनला एलबीडब्ल्यू आऊट केलं. सुदर्शन 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. साईने शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. मॅथ्यू वेड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.