LSG vs CSK Live Score, IPL 2024 : एकाणा स्टेडियमवर लखनऊचाच डंका! चेन्नईचा 8 विकेट्सने पराभव

LSG vs CSK Live Score, IPL 2024 : आज लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर आयपीएल 2024 चा 34 वा सामना खेळला जाणार आहे. यात लखनऊ सुपर जाएंट्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान असणार आहे.    

LSG vs CSK Live Score, IPL 2024 : एकाणा स्टेडियमवर लखनऊचाच डंका! चेन्नईचा 8 विकेट्सने पराभव

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Score in Marathi: लखनऊचे होमग्राउंड असलेल्या अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत, त्यातून लखनऊने 2 सामने आपल्या खिशात टाकले आहेत, तर एका सामन्यात पराभवाला सामोरे गेले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्स ही 8 गुणांसोबत तिसऱ्या स्थानावर आहे, तर लखनऊ ही 6 गुणांसोबत पाचव्या स्थानावर आहे. तर आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार यावर सर्वांचे लक्ष असणार आहे? 

 

19 Apr 2024, 20:17 वाजता

10 ओव्हरनंतर सीएसकेचा स्कोर 81-3 असा आहे. चेन्नईकडून जडेजा हा 27 धावांवर आणि दुबे हा 1 धाव करून नाबाद आहे. तर लखनऊ सुपर जाएंट्सला आता या दोघं धाकड फलंदाजांच्या भागीदारीला तोडणं महत्वाचं ठरणार आहे.

19 Apr 2024, 20:09 वाजता

क्रुणाल पांड्याच्या 9 व्या ओव्हरमध्ये चेन्नईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हा 36 धावांची दमदार खेळी खेळून बाद झाला आहे. तिसऱ्या विकेटनंतर धाकड फलंदाज शिवम दुबे हा मैदानात आला आहे.

19 Apr 2024, 19:51 वाजता

5 व्या ओव्हरमध्ये लखनऊचा युवा गोलंजदाज यश ठाकुर याने, सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याला 17 धावांवर बाद केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर रविंद्र जडेजा हा फलंदाजीसाठी आलाये. तर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर चेन्नईचा स्कोर 42-2 असा आहे.

19 Apr 2024, 19:36 वाजता

लखनऊच्या मोहसिन खानने दुसऱ्याच ओव्हरमध्ये सीएसकेचा धाकड फलंदाज रचिन रविंद्र याला शून्यावर क्लिन बोल्ड केलं आहे. पहिल्या विकेटनंतर कॅप्टन ऋतूराज गायकवाड हा फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.

19 Apr 2024, 19:06 वाजता

LSG vs CSK toss update : लखनऊची टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

LSG प्लेइंग 11 -

क्विंटन डी कॉक, केएल राहुल (W/C), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर

CSK प्लेइंग 11 -

ऋतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (W), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना

 

19 Apr 2024, 18:36 वाजता

LSG vs CSK head to head :  

लखनऊ सुपर जाएंट्स आणि चेन्नई सिपर किंग्स आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 3 वेळेस आमनेसामने आले आहेत, यात दोघं संघांनी एकमेकांना कडी टक्कर देत 1-1 सामना आपल्या नावावर केला आहे. तर एका सामन्यात कोणत्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाहीये. आजच्या सामन्यात बघण्यायोग्य गोष्ट असणार की, कोणता संघ आज बाजी मारून आगेकूच करणार?