India vs England LIVE: टीम इंडियाची विजयाकडे वाटचाल; इंग्लंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला

वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून, इंग्लड संघ एकच सामना जिंकला आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाचा विजयरथ कायम ठेवण्याच्या आणि अग्रस्थानी राहण्याचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे स्पर्धेत आपलं आव्हान कायम ठेवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल.    

India vs England LIVE: टीम इंडियाची विजयाकडे वाटचाल; इंग्लंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला

World Cup India vs England Live: वर्ल्डकपमध्ये आज भारतीय संघासमोर इंग्लंड संघाचं आव्हान आहे. भारतीय संघाने आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात विजय मिळवला असून, इंग्लंड संघ मात्र 5 पैकी एकच सामना जिंकला आहे. गतवर्षीचा विजेता असणाऱ्या इंग्लंड संघाची या वर्ल्डकपमध्ये दाणादाण उडाली आहे. गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या तर इंग्लंड संघ नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारतीय संघाचा विजयरथ कायम ठेवण्याच्या आणि अग्रस्थानी राहण्याचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे स्पर्धेत आपलं आव्हान कायम ठेवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. 

29 Oct 2023, 20:56 वाजता

फिरकीपटूंनी इंग्लंडचा मिडल ऑर्डर मोडून काढली असून कुलदीप यादवने लियाम लिव्हिंगस्टोनला बाद करत एकमात्र अडचण दूर केली.

29 Oct 2023, 20:26 वाजता

शमीचा घातक मारा सुरूच असल्याचं समोर आलं आहे. मैदानात सेट होण्याचा प्रयत्न करत असलेल्या मोईन अलीला तंबूत पाठवलंय.

29 Oct 2023, 20:08 वाजता

इंग्लंडला विकेट्सची गळती लागल्यानंतर बटलरने काहीसा ब्रेक देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला अपयश आलं, कुलदीप यादवने बटलरची विकेट काढली.

29 Oct 2023, 19:25 वाजता

बुमराह आणि शमीने इंग्लंडला धक्क्यावर धक्के दिले आहेत. दोघांनी इंग्लंडची फलंदाजी मोडून काढली. शमीची हॅट्रीक हुकली... त्याने जॉनी बेअरस्टोला तंबूत पाठवलंय.

29 Oct 2023, 18:58 वाजता

डेव्हिड मलाननंतर आता बुमराहने जो रुटला पहिल्याच बॉलवर तंबूत पाठवलं. रुट गोल्डन डक झाला. 

29 Oct 2023, 18:56 वाजता

डेव्हिड मलानच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का बसलाय. स्टार जसप्रीत बुमराहने त्याची बोल्ड करत विकेट काढली.

29 Oct 2023, 17:59 वाजता

इंग्लंडसमोर 230 धावांचं आव्हान

टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, या सामन्यात टीम इंडियाची रनमशिन चालली नाही. त्यामुळे भारतीय संघाला केवळ 229 धावा करता आल्या आहेत. भारताकडून कॅप्टन रोहित शर्माने 101 बॉलमध्ये 87 धावांची झुंजार खेळी केली. तर सूर्यकुमार यादव याने 49 धावांची खेळी करत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याआधी चांगली सुरूवात मिळून देखील केएल राहुलला मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस बुमराहने टीम इंडियाला फिनिशिंग टच दिला अन् टीम इंडियाचा स्कोर 290 धावांवर पोहोचवला. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर क्रिस वोक्स आणि आदिल रशिद यांनी 2-2 गडी बाद केले.

29 Oct 2023, 17:40 वाजता

सूर्यकुमार यादवने अखेरीस वादळी खेळी करत टीम इंडियाची धावसंख्या वाढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी त्याचं अर्धशतक हुकलं.

29 Oct 2023, 17:12 वाजता

रविंद्र जडेजा 8 धावा करून बाद झाल्यानंतर मोहम्मद शमी देखील झटपट बाद झालाय. त्याने फक्त 1 रन केला.

29 Oct 2023, 16:53 वाजता

टीम इंडिया कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंडविरुद्घ दमदार खेळीचं प्रदर्शन केलं. एकामागून एक विकेट्स जात असताना रोहित मैदानात चिटकून राहिला अन् धावसंख्या वाढवली. मात्र, त्याला शतक पूर्ण करता आलं नाही. तो 87 धावा करत बाद झाला. 101 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने त्याने धावा चोपल्या.