IPL 2024 : मुंबई इंडियन्समध्ये 'नाराजीनाट्य', पांड्याच्या कॅप्टन्सीवर आरोप? संघातील बड्या खेळाडूची खळबळजनक पोस्ट

Mohammad Nabi Instagram story : हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता मुंबईच्या (Mumbai Indians) स्टार गोलंदाजाने केलेल्या इन्टाग्राम पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Apr 19, 2024, 06:28 PM IST
IPL 2024 : मुंबई इंडियन्समध्ये 'नाराजीनाट्य', पांड्याच्या कॅप्टन्सीवर आरोप? संघातील बड्या खेळाडूची खळबळजनक पोस्ट  title=
Mohammad Nabi Unhappy With Hardik Pandya Captaincy

Mohammad Nabi Unhappy With Hardik Pandya Captaincy : पाचवेळा आयपीएल ट्रॉफीला गवासणी घालणाऱ्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यंदाच्या हंगामात नेहमीप्रमाणे सावध सुरूवात केली आहे. मागील दोन सामन्यात मुंबईने घेयर बदलले अन् आपली लोकल पुन्हा रुळावर आणली आहे. यंदाच्या हंगामात रोहित शर्मा नव्हे तर हार्दिक पांड्या मुंबईची कॅप्टन्सी करतोय. त्यामुळे मुंबईला आधीच मोठा सेटबॅक मिळाला होता. अशातच अजूनही मुंबई इंडियन्समध्ये सर्वाकाही अलबेल नसल्याची माहिती समोर येत आहे. त्याला कारण मुंबईच्या खेळाडूची एकन इन्टाग्राम पोस्ट... मुंबई इंडियन्सचा स्पिनर मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याची पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.

आयपीएलमध्ये फ्रँचायझीसाठी फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी संधी न मिळाल्याबद्दल नबीने एका चाहत्याची पोस्ट शेअर केली. मुंबईला विकेट्सची गरज असताना देखील पांड्याने मोहम्मद नबीला बॉलिंगला बोलवलं नाही. पण नबीने बॉन्ड्री लाईनवर आशुतोष शर्माचा सुंदर कॅच घेतला होता. बॉलिंगने नाही तर फिल्डिंगने संघाला साथ देता आल्याचं समाधान नबीच्या चेहऱ्यावर होतं. एका चाहत्याने तोच फोटो शेअर केला अन् त्याला कॅप्शन दिलं होतं. तुमच्या कर्णधाराचे काही निर्णय खूप विचित्र आणि लोकांना आश्चर्यचकित करणारे आहेत, असं त्या चाहत्याने लिहिलं होतं. तर प्रेसिडेंट (मोहम्मद नबी) हा गमेचेंजर ठरलाय. दोन महत्त्वाचे कॅच आणि एक रनआऊट, असंही त्या चाहत्याने लिहिलं होतं. हीच पोस्ट नबीने इन्टाग्रामवर शेअर केली होती.

मोहम्मद नबीने इन्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. मात्र. नबीने काही मिनिटानंतर पोस्ट डिलीट केली. मात्र, तोपर्यंत पोस्ट व्हायरल झाली होती. नबीवर अन्याय होत असल्याची चर्चा गेली काही दिवस सुरू आहे. दिल्लीविरुद्ध त्याने केवळ 8.5 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या होत्या. तर आरसीबीविरुद्ध त्याला फक्त 1 ओव्हर टाकण्याची संधी मिळाली. चेन्नईविरुद्ध नबीने 6.33 च्या इकॉनॉमी रेटने 3 ओव्हर केल्या. मात्र, त्याला त्यानंतर संधीच मिळाली नाही. त्यामुळे आता पांड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, पंजाब किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना निर्धारित वेळेत ओव्हर पूर्ण करता आल्या नाही. यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला याचा मोठा झटका बसला आहे. या कारणामुळे आता हार्दिक पांड्याला 12 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. स्लो ओव्हर रेटमुळे त्याला आता मोठा फटका बसला आहे.