Mumbai Indians Playoff Scenario: थांबा...! मुंबईला अजूनही प्लेऑफ गाठण्याची संधी; पाहा कसं आहे समीकरण

IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario: हैदराबादला पराभूत केल्यानंतर मुंबईची टीम 10 व्या क्रमांकावरून 9 व्या क्रमांकावर आली आहे. यावेळी मुंबईच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. त्यांचं नेट रनरेट -0.212 आहे. हैदराबादविरुद्धच्या विजयापूर्वी मुंबई गुणतालिकेत तळाशी म्हणजेच 10व्या स्थानावर होती.

सुरभि जगदीश | Updated: May 7, 2024, 09:56 AM IST
Mumbai Indians Playoff Scenario: थांबा...! मुंबईला अजूनही प्लेऑफ गाठण्याची संधी; पाहा कसं आहे समीकरण title=

IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario: यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमची सुरुवात काही फारशी चांगली झालेली दिसली नाही. यावेळी मुंबईच्या टीमचे एकूण 12 सामने झाले असून केवळ 4 सामन्यांमध्ये टीमला विजय मिळवणं शक्य झालं नाही. सिझनच्या 55 व्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या टीमने सनरायझर्स हैदराबादला 7 विकेट्सने मात दिली. दरम्यान मुंबईसाठी हा विजय खूप खास आहे, याचं कारण म्हणजे या विजयामुळे टीमला अजूनही प्लेऑफ गाठण्याची संधी आहे. आता तुम्हाला वाटेल हे अशक्य आहे, तर हे अशक्य नसून कठीण गोष्ट मात्र आहे.

हैदराबादला पराभूत केल्यानंतर मुंबईची टीम 10 व्या क्रमांकावरून 9 व्या क्रमांकावर आली आहे. यावेळी मुंबईच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. त्यांचं नेट रनरेट -0.212 आहे. हैदराबादविरुद्धच्या विजयापूर्वी मुंबई गुणतालिकेत तळाशी म्हणजेच 10व्या स्थानावर होती. मुंबईने या सिझनमध्ये आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त 4 जिंकता आले आहेत. अशा स्थितीत येथून प्लेऑफसाठी पात्र ठरणं टीमसाठी सोपं नसणार आहे. पाहूयात कोणल्या समीकरणाने मुंबईची टीम प्लेऑफसाठी पात्र ठरू शकणार आहे.

'या' समीकरणाने गाठू शकते मुंबईची टीम प्लेऑफ

मुंबई इंडियन्सला त्यांचे उर्वरित दोन सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहेत. यावेळी जर टीमने एकंही सामना गमावला तर तिथून त्यांचा प्लेऑफचा प्रवास पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. मुंबई इंडियन्सच्या टीमचे पुढील दोन सामने कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्याशी होणार आहे. जर हे दोन्ही सामने मुंबईच्या टीमने जिंकले तर त्यांचे एकूण 12 पॉईंट्स होणार आहे. याशिवाय इतर टीम 12 पॉईंट्स गाठू नये यावर मुंबईला अवलंबून रहावं लागणार आहे. सध्या हैदराबाद, लखनऊ आणि चेन्नईचे 12-12 पॉईंट्स आहेत. अशा परिस्थितीत यातील दोन टीमन्से त्यांचे उर्वरित सर्व सामने गमावावेत, जेणेकरून मुंबईसाठी प्लेऑफचा मार्ग खुला राहील.

रनरेटचा रंगणार सर्व खेळ

मुंबईला पुढील दोन सामन्यांमध्ये केवळ विजयाची गरज नाही तर मोठ्या विजयाची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत मुंबईच्या टीमचं नेट रनरेट मायनसमध्ये आहे. अशा स्थितीत, टीमला मोठा विजय मिळवून निव्वळ नेट रनरेट सुधारावं लागणार आहे. जेणेकरून रन रेटमध्ये इतर टीम्सना मागे टाकून प्लेऑफ गाठता येईल.