हाँगकाँग सुपर सीरिज पी.व्ही.सिंधू अंतिम फेरीत

भारताची बॅडमिंटन पट्टू पी.व्ही सिंधूने हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचलेय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 25, 2017, 11:42 PM IST
हाँगकाँग सुपर सीरिज पी.व्ही.सिंधू अंतिम फेरीत title=

हाँगकाँग : भारताची बॅडमिंटन पट्टू पी.व्ही सिंधूने हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचलेय. 

शनिवारी हाँगकाँगमध्ये झालेल्या सेमीफायनलमध्ये सिंधूने थायलंडच्या रतचानोक इंतानोनचा पराभव केला. ४३ मिनिट चाललेल्या या सामन्यात सिंधूने रतचानोक इंतानोनचा २१-१७, २१-१७ ने पराभव केला. हाँगकाँग सुपर सिरिजच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची पी व्ही सिंधूची दुसरी वेळ आहे.

रविवारी हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटनची अंतिम सामना रंगणार आहे.अंतिम फेरीत सिंधूसमोर चायनिज तैपईच्या ताई त्झू-यिंग हिचं आव्हान असेल. ताई त्झू-यिंगने सेमीफायनल मॅचमध्ये कोरियाच्या सुंग-जी-ह्यूनचा २१-९, १८-२१, २१-७ ने पराभव केला.  

उपांत्य फेरीत सिंधूने सुरुवातीलाच तीन गुणांनी आघाडी घेतली होती. ब्रेकपर्यंत सिंधूने ही आघाडी कायम ठेवली. ब्रेकपर्यंत ११-७ असे गुण होते. त्यानंतर सिंधून स्ट्रोक्स आणि खेळात तेजी आणत १४-७ असे गुण केले.