Rohit Sharma: रोहित शर्मा थकला असून...; वर्ल्डकपपूर्वी भारताच्या कर्णधाराविषयी 'असं' का म्हणाला माजी खेळाडू?

Rohit Sharma: गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला फारसा चांगला खेळ करता आलेला नाही. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधारने मोठं विधान केलं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: May 8, 2024, 11:15 AM IST
Rohit Sharma: रोहित शर्मा थकला असून...; वर्ल्डकपपूर्वी भारताच्या कर्णधाराविषयी 'असं' का म्हणाला माजी खेळाडू? title=

Rohit Sharma: सध्या आयपीएल सुरु असून आगामी काळात टीम इंडियाला टी-20 वर्ल्डकप देखील खेळायचा आहे. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फॉर्म टीम इंडियासाठी चर्चेचा विषय ठरतोय. मुंबईसाठी रोहितने आयपीएल 2024च्या पहिल्या 7 सामन्यांत 297 धावा केल्या आहेत. यावेळी गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला फारसा चांगला खेळ करता आलेला नाही. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधारने मोठं विधान केलं आहे. 

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने रोहित शर्माच्या खराब फॉर्मवर भाष्य केलं आहे. परंतु 'थकलेल्या' भारतीय कर्णधाराला T20 वर्ल्डकपपूर्वी फ्रेश होण्यासाठी होण्यासाठी ब्रेक घेण्याची आवश्यकता आहे, असं त्याने म्हटलंय. पुढील महिन्यात होणाऱ्या T20 वर्ल्डकप 2024 मध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहितने सध्या सुरू असलेल्या IPL मध्ये मुंबई इंडियन्ससाठी गेल्या 5 सामन्यांमध्ये 4 सिंगल डिजिट स्कोअर केला आहे.

काय म्हणाला मायकल क्लार्क?

स्टार स्पोर्ट्सशी खास संवाद साधताना क्लार्क म्हणाला, 'माझ्या मते, रोहित शर्मा काहीसा थकला आहे. त्याला फ्रेश होण्याचा ब्रेक गरजेचा असून यामुळे चमत्कार देखील घडेल. परंतु भारतीय कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू म्हणून त्याला ब्रेक मिळत नाही. गेल्या आठवड्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रोहित इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला. ज्यामुळे टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये अचानक चिंता निर्माण झाली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने 3 दिवसांनी संपूर्ण सामना खेळला.

क्लार्कच्या म्हणण्यानुसार, रोहित एक फलंदाज म्हणून त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये पुन्हा येईल. तो खूप चांगला मूडमध्ये होता. तो आनंदी आहे, जे खरोखर एक चांगले चिन्ह आहे. तो त्याच्या टायमिंगशी झुंज देत नाही तर त्याला फक्त बाहेर पडण्याची गरज आहे.

रोहितसारख्या खेळाडूला आपला फॉर्म परत मिळवणं ही काळाची बाब असल्याचं क्लार्कचं म्हणणं आहे. आशा आहे की, तो कमी ताण घेईल आणि त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करेल. रोहित शर्मा एक प्रतिभावान खेळाडू आहे. तो सर्वोत्तम कामगिरी करतो, असंही क्लार्कने म्हटलंय.