T20 World Cup साठी साऊथ अफ्रिका संघाची घोषणा, आयपीएलचा बोलबाला... 15 पैकी 10 जणांची निवड

South Africa T20 World Cup Squad 2024: आगामी  टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी साऊथ अफ्रिका संघाची घोषणा झाली आहे. एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली साऊथ अफ्रिकेचा संघ खेळेल. 

सौरभ तळेकर | Updated: Apr 30, 2024, 03:42 PM IST
T20 World Cup साठी साऊथ अफ्रिका संघाची घोषणा, आयपीएलचा बोलबाला... 15 पैकी 10 जणांची निवड title=
South Africa announce T20 World Cup 2024 squad

South Africa announce T20 World Cup 2024 squad : जूनमध्ये सुरू होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी  (T20 World Cup 2024) आता सर्व 20 संघ जाहीर होत आहेत. अशातच आता साऊथ अफ्रिका संघाची घोषणा झाली आहे. आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये एडन मार्करामच्या (Aiden Markram) नेतृत्वाखाली साऊथ अफ्रिकेचा संघ खेळेल. साऊथ अफ्रिकेचा रेग्लुयर कॅप्टन टेम्बा बावुमा याची सुट्टी करण्यात आली असून साऊथ अफ्रिकन संघात दोन नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रयान रिकेल्टन आणि ओटनील बार्टमन या दोन अनकॅप खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. विशेष म्हणजे साऊथ अफ्रिकेच्या 15 खेळाडूंपैकी 10 खेळाडू सध्या आयपीएल गाजवत आहे. 

सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन आणि मार्को जॅन्सेन या तीन खेळाडूंना वर्ल्ड कप संघात स्थान मिळालं आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचे ॲनरिक नॉर्जिया आणि ट्रिस्टन स्टब्स यांना संघात समाविष्ठ करण्यात आलंय. लखनऊकडून खेळणारा क्विंटन डी कॉक तर गुजरात टायटन्स डेव्हिड मिलर देखील संघात आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्स गोलंदाज कागिसो रबाडा हा देखील साऊथ अफ्रिकेची गोलंदाजी संभाळेल. जेराल्ड कोएत्झी हा सध्या मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. तर केशव महाराज राजस्थानच्या संघात आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ : एडन मार्कराम (C), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फॉर्च्युइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ताब्राजी, टॅब्रीज ट्रिस्टन स्टब्स.

टी20 वर्ल्ड कप 2024 चे गट:

ग्रुप ए- भारत, पाकिस्तान, आयरलँड, कनाडा, यूएसए
ग्रुप बी- इंग्लँड, ऑस्ट्रेलिया, नामीबिया, स्कॉटलँड, ओमान
ग्रुप सी- न्यूझीलँड, वेस्टइंडीज, अफगानिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ग्रुप डी- साउथ अफ्रीका, श्रीलंका, बांग्लादेश, नीदरलँड्स, नेपाळ