Success Story: दृढनिश्चय, कौशल्य ते क्रिकेट स्टारडम! रविचंद्रन अश्विनची प्रेरणादायी यशोगाथा

Ravichandran Ashwin Success Story: चेन्नई, तामिळनाडूच्याा खेळपट्ट्यांवरून रविचंद्रन अश्विनने आपल्या क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात केली.

Pravin Dabholkar | Updated: Feb 18, 2024, 10:59 AM IST
Success Story: दृढनिश्चय, कौशल्य ते क्रिकेट स्टारडम! रविचंद्रन अश्विनची प्रेरणादायी यशोगाथा title=
Ravichandran Ashwin Success Story

Ravichandran Ashwin Success Story: एखादा क्रिकेटर आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे पाहतो. कधी तो खेळामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असतो तर कधी खेळ चालत नसल्याने टीकाकारांचे लक्ष्य बनलेला असतो. पण या दोन्ही परिस्थितीला तो कसं सामोरं जातो? हे त्याच व्यक्तीमत्व ठरवत असतं. येथे  रविचंद्रन अश्विन जिंकतो. परिस्थिती कोणतीही असो. टीम इंडिया मॅच जिंकायला आलीय किंवा दबावाखाली खेळतेय असं वाटत असतानाही, तो आपला शांत, नम्र स्वभाव सोडत नाही. आश्विनच्या यशाच्या कहाणीबद्दल जाणून घेऊया. 

चेन्नई, तामिळनाडूच्याा खेळपट्ट्यांवरून रविचंद्रन अश्विनने आपल्या क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात केली. आश्विनचा जन्म1986 झाला. आपण चांगले क्रिकेट होऊ शकतो हे त्याला वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात आले होते. त्यानुसार त्याने आपले आयुष्य प्लान करायला सुरुवात केली. वयाच्या 12 व्या वर्षी आश्विन एमआरएफ अकादमीमध्ये गेला. येथे जाऊन त्याने सुनील सुब्रमण्यम आणि एल. शिवरामकृष्णन यांसारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन घेतले. आश्विनच्या ऑफ-स्पिन गोलंदाजीची येथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 

काही वर्षे संघर्ष

असे असले तरी अश्विनला चमकण्यासाठी काही वर्षे संघर्ष करावा लागला. सुरुवातीला त्याच्या प्रतिभेकडे कोणाचे लक्ष गेले नाही. त्याने 2006 मध्ये तामिळनाडूसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमधू पदार्पण केले. येथे त्याने केलेला खेळ पाहून साऱ्यांनीच तोंडात बोटे टाकली. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला 2010 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) साठी विचारणा झाली. येथे आश्विनने चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले. आयपीएलमुळे अश्विनला एक मोठे व्यासपीठ मिळाले. यासोबतच आणखी काही मोठं मिळालं असेल तर ते शेन वॉर्नसारख्या अनुभवी क्रिकेटपटूचं मार्गदर्शन. वॉर्नकडून धडे घेत आश्विनने आपलं स्किल आणखी तीक्ष्ण करुन घेतलं.

काउंटी क्रिकेट स्टंट आणि आंतरराष्ट्रीय यश

2011 मध्ये अश्विन वेगळ्या रुपात त्याच्या चाहत्यांसमोर आला. मधल्या काळात  तो टीम इंडियाचा भाग बनला नव्हता. अशावेळी थांबेल तो आश्विन कसला? थांबणे हे त्याच्या डिक्शनरीत नव्हते. त्याने इंग्लंडमधील एसेक्ससह काऊंटी खेळण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या खेळपट्ट्या आणि परिस्थितींमुळे त्याची गोलंदाजी अधिक परिपक्व झाली. ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पीचवर अधिक जुळवून घेऊ शकला. हा अनुभव आश्विनसाठी निर्णायक ठरला. कारण टीम इंडियामध्ये परतलेल्या आश्विनमध्ये अधिक आत्मविश्वास पाहायला मिळत होता. 

2011 मध्ये आश्विनची किर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली होतीय अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि दुसऱ्या डावातच 5 बळी घेतले. यानंतर ऑस्ट्रेलिया (2011-12) आणि इंग्लंड (2014) मधील त्यांच्या परदेशातील विजयांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचा प्रमुख फिरकीपटू आपण असल्याचे त्याने आपल्या खेळातून दाखवून दिले. 

2015-16 च्या ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत आश्विन अव्वल स्थानी होता. त्याच्या कॅरम बॉल गोलंदाजीने भल्याभल्या बॅट्समनची दांडी गुल केली. त्याने रवींद्र जडेजासोबत जबरदस्त भागीदारी करत भारताला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल ठेवण्यास मदत केली. 

आपले स्थान पुन्हा मिळवले

दरम्यानच्या काळात आश्वीनता फॉर्म हरवला. यानंतर त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर झालेल्या टीकेमुळे आव्हाने उभी राहिली. त्याला 2018 मध्ये भारतीय संघातून वगळण्यात आले होते, पण त्याला स्वत:ला पुन्हा सिद्ध करायचे होते. त्याने निर्धाराने परत लढा दिला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आणि आपले स्थान मिळवून दाखवले. अनुकूलता हे अश्विनच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्याने स्वत:ला नव्याने शोधून काढले आहे. बॅट आणि बॉल या दोन्हीमध्ये योगदान देत भारतीय संघात एक महत्त्वाचा खेळाडू आहे. अश्विनने मैदानात पाऊल ठेवताच, चेन्नई क्लब ते कसोटी स्टारडम हा त्याचा प्रवास महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी ठरतोय. कोणत्याही परिस्थिती खचून न जाता नम्रपणे शिकत राहणे, हेदेखील शिकण्यासारखेच आहे.