Ducati Monster 797 Plus भारतात लॉन्च, किंमत...

...

Updated: Jun 11, 2018, 11:43 AM IST
Ducati Monster 797 Plus भारतात लॉन्च, किंमत... title=
Image: www.ducati.com

नवी दिल्ली : बाईक प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, Ducati इंडियाने आपल्या मॉन्सटर फॅमिलीत आणखीन एक नवी बाईक लॉन्च केली आहे. डुकाटी मॉन्सटर रेंजच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीने Monster 797 या बाईकची नवी व्हेरिएंट बाईक Monster 797 Plus लॉन्च केली आहे.

गाडीची किंमत

Ducati Monster 797 Plus या गाडीची किंमत भारतीय बाजारात 8.03 लाख रुपये (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे. ही किंमत स्टँडर्ड व्हेरिएंटच्या समान आहे. 797 Plus या बाईकमध्ये फ्लाय स्क्रीन आणि पॅसेंजर सीट कव्हर देण्यात आली आहे. दोघांचीही फिनिशिंग बाईकच्या बॉडी कलरनुसार देण्यात आली आहे.

जर तुमच्याकडे Ducati Monster 797 असेल तर तुम्ही या अॅक्सेसरिज खरेदी करुन स्टँडर्ड मॉन्सटर 797 मध्ये फिट करु शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला 30,000 रुपये अतिरिक्त पेमेंट कराव लागणार आहे. 

Monster 797 Plus ग्राहकांना स्टार व्हाईट सिल्क, डुकाटी रेड आणि डार्क स्टेल्थ कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. Monster 797 गाडीत 803 cc L- ट्विन सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. यामुळे 8,250 rpm वर 75hp ची पावर आणि 5,750 rpm वर 69Nm टार्क जनरेट करतं. ट्रान्समिशनसाठी गाडीला सिक्स स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

गाडीच्या डॅशबोर्डवर मोठी LCD हाय विझिबिलिटी स्क्रीन देण्यात आली आहे. या स्क्रिनवर स्पीड, rpm, इंजिन ऑईल टेम्परेचर सारखे फिचर्स दिसणार आहेत. या गाडीच्या हेडलाईटमध्ये LED पोझिशन लाइट्स देण्यात आले आहेत. तसेच रियरमध्येही LED लाईट्स देण्यात आले आहेत.