Google Pay, Paytm, Amazon app आणि PhonePe ला जोरदार टक्कर, येत आहे नवीन पे अॅप

 भारतीय बाजारात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणखी एक नवीन अ‍ॅप बाजारात येत आहे.  

Updated: Apr 6, 2021, 10:19 AM IST
Google Pay, Paytm, Amazon app आणि PhonePe ला जोरदार टक्कर, येत आहे नवीन पे अॅप  title=

मुंबई : आपण सध्याच्या पेमेंट अ‍ॅप्सवर  (Payment Apps) खूश नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. भारतीय बाजारात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणखी एक नवीन अ‍ॅप बाजारात येत आहे. भारतीय ऑनलाईन पेमेंट मार्केटमध्ये येण्यासाठी कंपनीने सर्व तयारी पूर्ण केली आहे. (Google Pay, Paytm and PhonePe will get a fierce competition)

OnePlusचे नवीन पेमेंट अ‍ॅप  

telecomtalkच्या अहवालानुसार, चीनी मोबाइल निर्माती कंपनी वनप्लस (OnePlus) लवकरच भारतीय बाजारात पेमेंट अ‍ॅप बाजारात आणणार आहे. अहवालात असे म्हटले आहे की, कंपनीने डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये प्रवेश करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

 भारतात OnePlus ला नवीन ट्रेडमार्क मिळला

रिपोर्टनुसार, नवीन पेमेंट अ‍ॅप भारतात लाँच करण्यापूर्वी वनप्लसच्या (OnePlus ) स्पेशल ट्रेडमार्क फीचरवर बर्‍यापैकी चर्चा होत आहे. कंपनीने ऑक्सिजन ओएस या (OxygenOS)ऑपरेटिंग सिस्टममध्ये या नवीन फीचरसाठी अर्ज केला आहे. प्राप्त माहितीनुसार, वनप्लसला एक नवीन ट्रेडमार्क मिळाला आहे.

OnePlus Pay असेल नाव

असे सांगितले जात आहे की, वनप्लसच्या (OnePlus) नवीन पेमेंट अ‍ॅपचे नाव वनप्लस पे (OnePlus Pay) असे असेल. हे पेमेंट अ‍ॅप सध्याच्या बाजारात गूगल पे, पेटीएम, फोन पे आणि व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट,  (Google Pay, Paytm, PhonePe) अॅमेझॉन (Amazon app) सारख्या मोठ्या अ‍ॅप्सशी स्पर्धा करेल.

लवकरच नवीन अॅप सुरु होईल

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वनप्लसचे (OnePlus)नवीन पेमेंट अ‍ॅप या महिन्यापासून सुरु होऊ शकते. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जाहीर केलेले नाही.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की चीनी मोबाइल निर्माती कंपनी वनप्लस (OnePlus) भारतात जवळजवळ सर्व प्रकारच्या विभागांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरुवातीच्या काळात कंपनीने भारतात स्मार्टफोन लॉन्च केले. आता कंपनीने स्मार्ट टीव्ही आणि स्मार्ट वॉच विभागातही प्रवेश केला आहे. असे म्हणू द्या की वनप्लस पे (OnePlus Pay) हे भारतासाठी एक नवीन अॅप असेल. परंतु, कंपनी चीनमध्ये आधीच ही सेवा देत आहे.