UPI Payment Limit : यूपीआयद्वारे एका वेळी किती रक्कम ट्रान्सफर करता येते?

यूपीआयमुळे सुट्ट्या पैशांची (UPI Payment Limit) कटकट राहिली नाही. तसेच पाकिट ठेवण्याची गरज भासत नाही. त्यामुळे बहुतांश जण यूपीआयचा वापर करतात.  

Updated: Oct 11, 2022, 06:41 PM IST
UPI Payment Limit : यूपीआयद्वारे एका वेळी किती रक्कम ट्रान्सफर करता येते?  title=

मुंबई : सध्या डीजीटल युग आहे. सर्वत्र व्यवहारासाठी रोख रक्कमेऐवजी यूपीआयचा (UPI) वापर केला जातो. यूपीआयमुळे सुट्ट्या पैशांची कटकट राहिली नाही. तसेच पाकिट ठेवण्याची गरज भासत नाही. त्यामुळे बहुतांश जण यूपीआयचा वापर करतात. मिळालेल्या माहितीनुसार दररोज 20 कोटींपेक्षा जास्त यूपीआयद्वारे व्यवहार केलं जातं. यूपीआयद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त व्यवहारांचीही मर्यादा आहे.  मात्र अनेकांना एका दिवसात यूपीआयद्वारे किती वेळा व्यवहार करु शकतो हे माहिती नाही. (how much money can be transferred with upi at one go know what is the limit)

भीम यूपीआयची मर्यादा 1 लाख

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, UPI द्वारे एका वेळी जास्तीत जास्त 2 लाख रुपयांचं व्यवहार करता येतं. जर एखाद्याने BHIM UPI च्या मदतीने ट्रान्सफर केले तर तो एका व्यवहारात जास्तीत जास्त 1 लाख रुपये ट्रान्सफर करू शकतो. NPCI वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, बँक खात्यातून एका दिवसाची मर्यादा फक्त 1 लाख रुपये आहे.

एका दिवसात किती ट्रांजेक्शन?

एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार,  एचडीएफसी बँक UPI च्या मदतीने दिवसातून 10 वेळा UPI द्वारे पेमेंट करू शकता. ज्याची एकूण किंमत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. 

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सर्व बँकांना त्यांच्या सोयीनुसार UPI पेमेंटसाठी लिमिट सेट करण्याची परवानगी दिली आहे. ही मर्यादा बँकेनुसार वेगळी असू शकते. UPI पेमेंटसाठी प्रामुख्याने 3 प्रकारच्या मर्यादा आहेत. पहिली मर्यादा ही एका दिवसातील कमाल व्यवहार मूल्य आहे. दुसरी मर्यादा म्हणजे एका वेळी जास्तीत जास्त व्यवहारांची संख्या आणि तिसरी मर्यादा म्हणजे एका दिवसातील जास्तीत जास्त व्यवहारांची संख्या.