इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्याची तुम्हालाही हौस आहे? मेटा आणणार नवीन फिचर, जाणून घ्या

Instagram New Features: इन्स्टाग्राम त्यांच्या युजर्ससाठी नवीन फिचर घेऊन येत आहे. त्यामुळं रिल्स करणे अधिक सोपे होणार आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 18, 2023, 12:22 PM IST
इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्याची तुम्हालाही हौस आहे? मेटा आणणार नवीन फिचर, जाणून घ्या title=
Instagram is adding new features, editing tools filters

Instagram New Features: Instagram वरील रिल्स हे चाहत्यांच्या पसंतीत पडत आहेत. अनेक कंटेट क्रिएटर रिल्सच्या माध्यमातून नवीन करियरचा पर्याय शोधत असतात. तर, काही फक्त हौस म्हणून इन्स्टा रिल्स बनवतात. फावल्या वेळात एक छान विरंगुळा म्हणूनही रिल्स पाहिले जातात. मात्र, लवकरच इन्स्टाग्राम युजर्ससाठी एक नवीन फिचर देण्यात आले आहे. 

इन्स्टाग्रामवर नवीन अपडेट मिळाल्यानंतर युजर्स Reels, फिड फोटो, Carousels (स्लाइडिंग फोटो) आणि स्टोरीज आता पूर्वीपेक्षा जास्त छान करता येऊ शकणार आहेत. कंपनीने म्हटलं आहे की, ते क्रिएटर्ससाठी इनसाइटदेखील अपडेट करत आहेत. ज्यामुळं ते त्यांचा कंटेट आणि परफोर्मेन्स अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकता. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आज आम्ही रील्स, फिड फोटो, स्टोरेज आणि न्यू इनसाइट्स जारी करत आहोत. नवीन इनसाइटच्या मदतीने क्रिएटर्सना त्यांचा कंटेट कसा चालतोय व त्याला किती रिच मिळतोय हे कळू शकणार आहे. नवीन फिचर्सची घोषणा मेटाचे सीईओ मार्क झुकेबर्गने त्यांच्या इन्स्टाग्राम चॅनेलवर केली आहे. 

Reels साठी एडिटिंग टूल 

Instagram नं म्हटलं आहे की, युजर्ससाठी आम्ही एक नवीन फिचर्स घेऊन येत आहोत. यात ते फोटो किंवा व्हिडिओ क्रॉप करु शकतात आणि इंडिव्हिज्युअल व्हिडिओ क्लिप्स रोटेट करु शकणार आहात. त्याचबरोबर लवकरच अनडू आणि रिडूचा पर्यायही देण्यात येणार आहे. येत्या काही काळात अनेक नवीन फिचर्सही पाहायला मिळणार आहेत. 

नवीन फिचर्स 

कंपनीने पुढे म्हटलं आहे की, आम्ही 10 नवीन इंग्लिश टेक्स्ट टू स्पीच व्हॉइस हे फिचरही देण्यात आले आहे. यातील युजर्स कोणतेही एक निवडू शकतात. इन्स्टाग्रामचे हे फिचर्स सध्या फक्त काही निवडक देशांपुरते मर्यादित आहेत. तसंच, तुमच्या क्रिएटिव्हीटीचा चालना मिळावी यासाठी सहा नवीन प्रकारचे टेक्स्ट फॉन्ट आणि स्टाइल उपलब्ध केले आहेत. जे शेकडो भाषांमध्ये अपलब्ध आहेत. याच्या मदतीने युजर्स त्यांच्या टेक्स्टला वेगळा लूक देऊ शकतात. 

ऑडिओ ब्राउजरचा अॅक्सेस मिळणार 

Instagram कडून ऑडिओ ब्राउजर किंवा ट्रेंडिग ऑडियोचा अॅक्सेस युजर्सना मिळावा यासाठी नवीन पर्याय तयार करण्यात येत आहे. सध्या या फिचरची चाचणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ड्राफ्ट फिचरचाही मेकओव्हर करण्यात येत आहे. युजर्सना ड्राफ्टदेखील पाहता येणार आहे तसंच, ड्राफ्ट कंटेटही शेड्युल करता येणार आहे.