भारतात या दिवशी लॉन्च होणार 5 G चे हे दोन जबरदस्त मोबाईल, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

भारतात लवकरच ओप्पो रेनो 6 (Oppo Reno 6) नवीन मालिका दाखल करणार आहे.  

Updated: Jul 2, 2021, 02:30 PM IST
भारतात या दिवशी लॉन्च होणार 5 G चे हे दोन जबरदस्त मोबाईल, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या title=

मुंबई : भारतात लवकरच ओप्पो रेनो 6 (Oppo Reno 6) नवीन मालिका दाखल करणार आहे. ओप्पो रेनो 6 प्रो 5 जी (Reno 6 Pro 5G)आणि ओप्पो रेनो 6 लॉन्च ( Oppo Reno 6) झाल्याच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून ऐकायला मिळत आहेत. त्याचबरोबर आता कंपनीने स्पष्ट केले आहे की हे स्मार्टफोन 14 जुलैला भारतीय बाजारात आणले जातील. हा फोन फ्लिपकार्टवर (Flipkart) उपलब्ध असेल. चला या फोनबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ या.

फोनची संभाव्य किंमत

हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आले असून बहुतेक समान किंमतीने तो भारतात लॉन्च होईल, अशी अपेक्षा आहे. चीनमध्ये ओप्पो रेनो 6 प्रो 5 जी ची किंमत CNY 3,499 म्हणजेच 39,800 रुपये आहे. तर ओप्पो रेनो 6 सीएनवाय 2,799 म्हणजेच सुमारे 31,800 रुपये किंमतीला बाजारात लॉन्च केला आहे.

Oppo Reno 6 Pro 5Gचे फीचर्स

ओप्पो रेनो 6 प्रो 5 जी मध्ये 6.55 इंचाचा फुल-एचडी + ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे.  यात 1200 प्रोसेसर वापरला गेला आहे. फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी अंतर्गत स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अॅंगल सेन्सर, सेकंड 2-मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, यात 4,500mAh  बॅटरी आहे, जी 65 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Oppo Reno 6चे वैशिष्ट्य

ओप्पो रेनो 6 स्मार्टफोनमध्ये (Oppo Reno 6) 6.43-इंचाचा फुल एचडी + होल-पंच एमोलेड डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 90 हर्ट्झ रिफ्रेश दर आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड कलरओआरएस 11 वर कार्य करतो. कामगिरीसाठी, त्यात मीडियाटेक डायमेन्शन 900 प्रोसेसर वापरला गेला आहे. फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी अंतर्गत स्टोरेज आहे. फोनची किंमत सुमारे 30 हजार रुपये असू शकते.

कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी ओप्पो रेनो 6 फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय 8 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा तिसरा लेन्स देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, यात 4,300 एमएएच बॅटरी आहे, जी 65 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.