Oppo या दोन स्मार्टफोनवर देतेय 5 हजार रुपयांची बंपर सूट

ओप्पो आपल्या ओप्पोच्या सिरीजमध्ये विविध फोन लॉंच करत असते. आता ओपोने नुकत्याच लॉंच केलेल्या दोन स्मार्टफोन बंपर सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन अजून खरेदी केला नसेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. ओप्पोच्या या ऑफरबद्दल जाणून घेऊयात...

Updated: May 14, 2022, 09:27 PM IST
Oppo या दोन स्मार्टफोनवर देतेय 5 हजार रुपयांची बंपर सूट  title=

मुंबई : ओप्पो आपल्या ओप्पोच्या सिरीजमध्ये विविध फोन लॉंच करत असते. आता ओपोने नुकत्याच लॉंच केलेल्या दोन स्मार्टफोन बंपर सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन अजून खरेदी केला नसेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. ओप्पोच्या या ऑफरबद्दल जाणून घेऊयात...

एप्रिल महिन्यात Oppo ने त्यांच्या F21 Pro मालिकेचे दोन नवीन स्मार्टफोन लॉंच केले होते. ज्याची पहिली विक्री 15 एप्रिल रोजी Amazon वर करण्यात आली होती.आता याच OPPO F21 Pro आणि OPPO F21 Pro 5G वर 5000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 

या दोन स्मार्टफोनवर डिस्काऊंट 

ओप्पोच्या ऑफिशियल वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार OPPO F21 Pro ची किंमत 27,999 रुपये आहे. या स्मार्टफोनला तुम्ही फक्त 22,999 रुपये खरेदी करू शकता. 
याशिवाय OPPO F21 Pro 5G स्मार्टफोनची किंमत 31,999 रुपये आहे. तुम्ही फक्त 26,999 रुपयात हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

इतर ऑफर 

Oppo या दोन्ही स्मार्टफोन्सवर 2,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट देत आहे. यासोबतच, तुम्ही हे दोन्ही स्मार्टफोन 3 ते 6 महिन्यांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता.

फिचर्स 

ओप्पो F21 Pro स्मार्टफोन Android 12 वर आधारित ColorOS 12.1 वर काम करतो. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.4-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 180Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट ऑफर करतो. 

ओप्पो F21 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 60Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. फोन Android 12 वर आधारित ColorOS 12 वर चालतो. तसेच, या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आहे जी 33w फास्ट चार्जरला सपोर्ट करते.