टोयोटाची फॉर्च्यूनर टीआरडी स्पॉर्टिवो भारतात लॉंच

या एडीशनने सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत खास फिचर्स दिले आहेत. याची किंतही खासच ठेवण्यात आली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 17, 2017, 04:55 PM IST
टोयोटाची फॉर्च्यूनर टीआरडी स्पॉर्टिवो भारतात लॉंच title=

नवी दिल्ली : इनोव्हा आणि फॉर्च्युनरसारख्या दमदार आणि लोकप्रिय एसयूवी लॉंच करणाऱ्या टोयोटाने भारतात आपली नवी एडीशन लॉंच केली आहे. 'फॉर्च्यूनर टीआरडी स्पॉर्टिवो'
नावाच्या या एडीशनने सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत खास फिचर्स दिले आहेत. याची किंतही खासच ठेवण्यात आली आहे.

टोयोटा टीआरडी स्पोर्टीव्होमध्ये लाल आणि काळे ग्राफिक्स आहेत, जीआरएल आणि दरवाजेवरील 'टीआरडी' लोगोसह येते. यात २.८ लीटर डिझेलचे इंजिन आहे, जे सध्याच्या मॉडेल प्रमाणेच आहे. हे इंजिन १७५ हॉर्सपॉवर आणि जास्तीत जास्त ४५० न्युटनपर्यंत शक्ती निर्माण करण्यास सक्षम आहे.
हे इंजिन ६ स्पीड मॅन्युअल किंवा ६ स्पीड स्वयंचलित ट्रांसमिशनसह सुसज्ज केले गेले आहे. यावेळेस एसयूव्हीची सुरूवात केव्ही पर्ल व्हाईट कलर मध्ये करण्यात आली आहे.
टोयोटा फॉर्च्यूनर टीआरडी स्पॉर्टिवोची दिल्लीतील एक्स-शोरूमची किंमत ३६.८८ लाख रुपये आहे.